आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणे, अॅलोपॅथींमुळेच म्यूकरमायकोसिस होतो; आयएमएची कारवाई करण्याची मागणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

आधुनिक अॅलोपॅथी मूर्ख आणि बौद्धिक दिवाळखोरीचे शास्त्र अाहे. अॅलोपॅथीच्या औषधांच्या अतिवापरामुळे काळी-पांढरी बुरशी ( म्यूकरमायकोसिस) सारखे आजार होत आहेत, असा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. रामदेव यांच्या दाव्यामुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कारवाई करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. तसेच बाबांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, पतंजली योग पीठाचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी सारवासारव केली. रामदेव यांच्यावर अायएमएचे आरोप चुकीचे असून आधुनिक विज्ञान व त्याची प्रॅक्टिस करणाऱ्यांविरोधात बाबा रामदेव यांच्या मनात कोणतेही किल्मिष नाही, असे बालकृष्ण म्हणाले. तत्पूर्वी, आयएमएने शनिवारी प्रसिद्धिपत्रक जारी केले. यामध्ये रामदेव यांच्या एका व्हिडिओचा संदर्भ देण्यात आला आहे. आधुनिक अॅलोपॅथी शास्त्र म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. अॅलोपॅथी आैषधांच्या अतिवापरामुळेच काळ्या-पांढऱ्या बुरशीसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो आहे, असे बाबा या व्हिडिओत सांगताना दिसतात.

दरम्यान, आयएमएने बाबांवर टीकेची झोड उठवली आहे. रामदेवबाबा हे स्वत: एक आंतरराष्ट्रीय व प्रख्यात योगगुरू, शिवाय ते एका औषधी कंपनीचे (पतंजली) प्रमुखही आहेत. त्यांनी अनेक वेळा आपल्या कंपनीच्या उत्पादनांसंदर्भात खोटेनाटे दावे करून जनतेची दिशाभूल केली आहे, असे आयएमएने म्हटले आहे.

...मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे अॅलोपॅथीमध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत.तेसुद्धा मूकपणे हे सर्व पाहत राहतील तर मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, अशा तिरकस शब्दात आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जे.ए.जयलाल आणि सरचिटणीस डॉ.जयेश लेले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. र महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी बाबांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका केली.

बातम्या आणखी आहेत...