आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारने परदेशात अडकलेल्या ओवरसीज सिटीजंस ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड होल्डर्सच्या चार कॅटेगरीतील नागरिकांना नियमांमध्ये सवलती दिल्या आहेत. यामुळे आता त्यांना भारतात परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गृह मंत्रालयाने शुक्रवारी याचे नोटिफिकेशन जारी केले. ओसीआय कार्ड परदेशात राहणाऱ्या भारतीयांना जारी केले जाते. यामुळे त्यांना व्हिसाशिवाय येण्या-जाण्याची परवानगी मिळते. परंतू, कोरोना व्हायरसमुळे सरकारने परदेशातून येणाऱ्यांसाठी नियमांत बदल केले होते.
Relaxating Visa & Travel restrictions imposed in wake of #COVID19, certain categories of #OCI cardholders stranded abroad have been permitted to come to India.#coronavirus #strandedindians#IndiaFightsCoronavirus pic.twitter.com/3Ws7KzsekX
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 22, 2020
ओसीआय कार्डहोल्डरच्या या 4 कॅटेगरीला सवलत
1. परदेशात जन्म झालेल्या मुलांना घेऊन भारतात येण्याची इच्चा असेल, तर येऊ शकतात. 2. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर येऊ शकतात. 3. पती किंवा पत्नीपैकी एखाद्याकडे ओसीआय कार्ड आहे आणि दुसरा भारतात असेल आणि त्यांचे स्थाई घर भारतात असावे. 4. परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात येण्याची परवानगी.
ओसीआय कार्डहोल्डर्सने नियमात सवलती देण्याची अपील केली होती
सरकार समुद्रामार्गे आणि विमानातून परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशात आणत आहे. पण, लॉकडाउनच्या नियमात बदल केल्यामुळे अनेक ओसीआय कार्डधारकांना तिकीट मिळत नाहीये. यातील अनेक असे कुटुंब आहेत, ज्यात आई-वडिलांना तिकीट मिळाले, पण मुलांचा जन्म परदेशात झाल्याने त्यांना येण्याची परवानगी मिळथ नाहीये. अशा सर्व लोकांनी सरकारला नियमात सूट देण्याची अपील केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.