आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Allowing Terrorists To Remain In Society Would Be Tantamount To Releasing 'man eating Leopards', Court Remarks | Marathi News

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण:अतिरेक्यांना समाजात राहू दिलेतर ते ‘नरभक्षक बिबट्या’ला खुले सोडण्यासारखे होईल,कोर्टाची टिप्पणी

अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेतील ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या विशेष न्यायालयाने म्हटले आहे की, ‘अशा लोकांना समाजात राहू दिले तर ते निरपराध-निर्दोष लोकांना खाणाऱ्या ‘नरभक्षक बिबट्या’ला खुले सोडण्यासारखे होईल.’ विशेष न्यायालयाने १८ फेब्रुवारीला सुनावलेल्या निकालाची सात हजार पानांची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. दोषींना फाशीची शिक्षा देणे योग्य ठरेल. कारण हे प्रकरण ‘दुर्मिळात दुर्मिळ’ या श्रेणीत येते, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल यांनी निकालात म्हटले आहे की, दोषींनी एका शांततापूर्ण समाजात अशांतता निर्माण केली आणि येथे राहून देशविरोधी कारवाया केल्या. केंद्र आणि गुजरातमध्ये घटनात्मक पद्धतीने निवडलेल्या सरकारबद्दल त्यांच्या मनात कुठलाही सन्मान नाही. काही जणांचा फक्त अल्लाहवर विश्वास आहे, सरकार किंवा न्यायपालिकेवर नाही. सरकारने या दोषींना तुरुंगात ठेवण्याची काहीही गरज नाही. विशेषत: त्यांना, ज्यांनी म्हटले होते की, आमचा फक्त आमच्या ईश्वरावर विश्वास आहे, इतर कुठल्याही गोष्टीवर नाही. त्यांना कायमस्वरूपी ठेवू शकेल असा कुठलाही तुरुंग देशात नाही. अशा लोकांना समाजात ठेवले तर ते ‘नरभक्षक बिबट्या’ला खुले सोडण्यासारखे होईल, जो मुले, वृद्ध, महिला, पुरुष, नवजात आणि वेगवेगळ्या जाती-समुदायाच्या निर्दोष लोकांना खातो. ४९ पैकी ११ दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीशांनी म्हटले की, त्यांना अंतिम श्वासापर्यंत तुरुंगात ठेवण्यापेक्षा कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करतील आणि तसे करण्यासाठी इतरांनाही मदत करतील हे निश्चित आहे.

सुनावणीदरम्यान काही दोषींनी म्हटले होते की, मुस्लिम असल्यामुळे आम्हाला दोषी ठरवले जात आहे. त्यावर कोर्टाने म्हटले की, हा तर्क स्वीकारण्यायोग्य नाही. भारतात असे कोट्यवधी मुस्लिम आहेत, जे कायद्याचे पालन करून राहत आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फक्त याच लोकांना का अटक केली? जर या प्रकरणात इतर लोकही सहभागी असते तर त्यांनाही अटक झाली असती, अशी टिप्पणीही कोर्टाने केली.

बातम्या आणखी आहेत...