आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Along With The Nation, Religion Also Becomes Strong: Yogi; Hundreds Of Shivacharyas Attend The World Veershaiva Convention

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रासोबत धर्मही सशक्त होतो : योगी; विश्व वीरशैव महासंमेलनात शेकडो शिवाचार्यांची उपस्थिती

वाराणसी \ रामेश्वर विभूते7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे सौंदर्य, संस्कृती आणि परंपरा अबाधित राहो हा आमचा संकल्प आहे. यामध्ये सर्वच समाजघटक आपापला हातभार लावत आहेत. हाच आमचा ध्यास असून हाच संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे. अशा संकल्पनांनी राष्ट्र सशक्त होते आणि त्यामुळेच धर्मही सशक्त होतो, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. काशीच्या जंगमवाडी मठामध्ये शुक्रवारी आयोजित वीरशैव विश्व संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आदित्यनाथ म्हणाले की, मी लहानपणापासून संतपरंपरेमध्ये शिकत असताना आणि नंतर राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर राजकीय कार्यक्रमासाठी देशभर फिरत होतो. त्या वेळी मला कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव पंथांच्या मठांनी आसरा दिला. या वेळी काशी जगद्गुरूंनी अयोध्या येथे भक्त निवासासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आम्ही तो बांधून भक्तांची सोय करू, असा प्रस्ताव योगींना दिला. त्यावर योगी यांनी केवळ वीरशैवच नाही, तर अनेक समाजांना अशी सोय करता येईल का ते पाहू, असे भाषणात सांगितले.

या वेळी व्यासपीठावर काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, काशी पीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...