आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पेश ठाकोर राधनपूरमधून विजयी:आधी पोटनिवडणूकीत हरले होते; पाटीदार आंदोलनाविरोधातील एकता मंचाने दिली ओळख

अहमदाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यावर ज्या राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर यांचा पराभव झाला होता. तिथूनच पुन्हा विजय मिळवण्यात त्यांना यश आले आहे. अल्पेश ठाकोर यांनी राधनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉ. हिमांशूभाई पटेल यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया अल्पेश ठाकोर यांच्या राजकीय प्रवासावर...

गुजरातमधील कोळी समुदायातील प्रभावी नेते अशी ओळख असलेले अल्पेश ठाकोर यांनी गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना आणि ओबीसी, एससी, एसटी एकता मंचाची स्थापना केली होती. पाटीदार आंदोलनाच्या विरोधात त्यांनी एकता मंचाची स्थापना केली होती.

अल्पेश यांच्या क्षत्रिय ठाकोर सेनेचा गुजरातेत चांगला प्रभाव आहे.
अल्पेश यांच्या क्षत्रिय ठाकोर सेनेचा गुजरातेत चांगला प्रभाव आहे.

क्षत्रिय ठाकोर सेनेची स्थापना

ठाकोर समुदायाच्या विविध अधिकारांसाठी त्यांनी 2011 मध्ये क्षत्रिय ठाकोर सेनेची स्थापना केली. 2016 मध्ये त्यांनी ठाकोर समुदायातील दारूच्या व्यसनाविरोधात मोहीम राबवली. या संघटेनेचे गुजरातमध्ये सुमारे 70 हजार सदस्य आहेत.

पाटीदार आंदोलनाविरोधात एकता मंच

हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षण आंदोलनाविरोधात अल्पेश ठाकोर यांनी ओबीसी, एससी, एसटी एकता मंचची स्थापना करत सर्व समुदायांना लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी केली. पाटीदार आंदोलनाचा छुपा हेतू आरक्षण रद्द करण्याचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. 2015 मध्ये ठाकोर मेहसाणात ओबीसी समुदायाची बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांना अटकही झाली होती.

2019 मध्ये ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला.
2019 मध्ये ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला.

काँग्रेसकडून आमदारकी, पक्ष सोडल्यानंतर पोटनिवडणुकीत पराभव

23 ऑक्टोबर 2017 मध्ये ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राधनपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 9 एप्रिल 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. त्यानंतर राधनपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा 3500 मतांनी पराभव झाला.

अल्पेश ठाकोर यांच्याविषयी थोडक्यात

  • वय - 47 वर्षे
  • शिक्षण - बारावी
  • गुन्हे - 6 गुन्ह्यांची नोंद
  • एकूण संपत्ती - 3 कोटी रुपये, चल-1.6 कोटी रुपये, अचल-1.4 कोटी रुपये
  • कर्ज - 14.8 लाख रुपये
  • उत्पन्न - 20.7 लाख रुपये
बातम्या आणखी आहेत...