आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील 50 वर्षांपासून इंडिया गेटची ओळख बनलेली अमर जवान ज्योती युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता सोहळ्याला सुरुवात झाली. अमर जवान ज्योती मशालीसह संपूर्ण लष्करी सन्मानासह युद्ध स्मारकावर नेण्यात आले.
1. अमर जवान ज्योतीवर पुष्प अर्पण करून सन्मानित करण्यात आले.
2. अमर जवान ज्योती मशालींमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
3. ज्योतीला लष्करी बँड आणि परेडद्वारे युद्ध स्मारकावर नेण्यात आले.
4. युद्ध स्मारकावर प्रज्वलित केलेल्या ज्योतीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
5. अमर जवान ज्योती मशालच्या माध्यमातून युद्ध स्मारकात मिसळण्यात आली.
अमर जवान ज्योतीजवळ उभारण्यात येणार नेताजींचा पुतळा
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की अमर जवान ज्योतीजवळ 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले जाईल. मूळ मूर्ती तयार होईपर्यंत ही मूर्ती तशीच राहणार आहे.
अमर जवान ज्योती भारत-पाक युद्धातील हुतात्म्यांची आठवण करून देते
अमर जवान ज्योती 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या 3,843 भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली होती. ती प्रथम 1972 मध्ये प्रज्वलित करण्यात आली होती. 26 फेब्रुवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते.
राष्ट्रीय युद्ध स्मारक 2019 मध्ये केंद्र सरकारने बांधले होते. 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या 26,466 भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ हे बांधण्यात आले होते. 25 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते.
अमर जवान ज्योती माजी सैनिकांच्या भावनांशी संबंधीत आहे
अमर जवान ज्योती इंडिया गेटवरून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत हलवण्याच्या सरकारच्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेक माजी सैनिकांनीही ही ज्योत आपल्या भावनांशी निगडित असल्याचे सांगत काढून टाकू नका असे आवाहन केले आहे. डिसेंबर 2021 ला 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली.
मात्र, ते युद्धस्मारकावर नेण्याचे समर्थक सांगतात की, तेथे पहिलेच सैनिकांच्या आठवणीत एक ज्योती उपलब्ध आहे. ती जागा फक्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी करण्यात आली होती. माजी नौदल प्रमुख एडमिरल अरुण प्रकाश यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमर जवान ज्योती तात्पुरत्या स्वरूपात इंडिया गेटवर बसवण्यात आली होती. आता आपले स्वतःचे युद्धस्मारक आहे, यामुळे ही ज्योत तिथे घेऊन जाणे योग्य राहील.
इंडिया गेट 84,000 ब्रिटिश भारतीय सैनिकांची आठवण
42 मीटर उंचीचा इंडिया गेट ब्रिटीश सरकारने बांधला होता. 1914-21 मधील पहिल्या महायुद्धात आणि तिसर्या अफगाण युद्धात ब्रिटीश सैन्याच्या वतीने शहीद झालेल्या 84,000 भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने हे बांधले होते. त्यावर त्या सैनिकांची नावेही कोरलेली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.