आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:अमरिंदर, जाखड भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीवर

दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, माजी काँग्रेस नेते सुनील जाखड, यूपी शाखेचे माजी अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्ती केली. भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे माजी प्रवक्ते जयवीर शेरगिल राष्ट्रीय प्रवक्ते असतील.

भाजपचे मदन काैशिक, विष्णुदेव साई, राणा गुरमितसिंह साेढी, मनाेरंजन कालिया व अमनज्याेत तसेच रामू वालिया (तिघेही पंजाबचे) यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान ५ डिसेंबरपासून भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दाेनदिवसीय बैठक राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरू हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...