आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे भरकटली:अमरनाथ एक्स्प्रेस रेल्वे रुळावरुन भरकटली, समस्तीपूरला जाणार हाेती, पोहाेचली विद्यापतीनगरला

भागलपूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये अमरनाथ एक्स्प्रेस रेल्वेमार्गातून भरकटली. ही रेल्वे बरौनीहून समस्तीपूरला जाणार हाेती, मात्र ती वेगळ्या रुळावर गेली आणि विद्यापतीनगर स्थानकावर पोहोचली. रेल्वे आऊटरवर पोहोचल्यावर चालकाला रेल्वे वेगळ्याच रुळावर पोहोचल्याचे लक्षात आले.

गुवाहाटीहून जम्मू तावी जाणारी अमरनाथ एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे बरौनीहून जात होती. रेल्वे समस्तीपूरला जाणार होती. मात्र, विद्यापतीनगरला पोहोचली. आऊटरवर चालकाच्या चूक लक्षात आली. यावर त्याने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यानंतर तातडीने रेल्वेला विद्यापतीनगरमधून परत बछवाडाला आणले गेले.

बातम्या आणखी आहेत...