आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amarnath Yatra 2020 Update | Decision On Yatra Tomorrow; With Approval, 500 People Can Go Every Day, The Covid Test Will Take Place

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा अमरनाथ यात्रा छोटेखानी!:बाबा बर्फानीचे आजपासून थेट दर्शन, यात्रेवर उद्या निर्णय; मंजुरी मिळाल्यास रोज 500 लोक जाणे शक्य, कोविड चाचणी होणार

मोहित कंधारी । जम्मू10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरच्या 10 पैकी 9 जिल्ह्यांत रेड झोन असल्याने मोठी समस्या
  • मंजुरी मिळताच केवळ बालटालमार्गे होणार यात्रा, हेलिकॉप्टरनेही दर्शन शक्य, चार हेलिपॅड तयार

अमरनाथ यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाखो भाविक बाबा बर्फानीच्या विशेष पूजेचा लाभ घेतील. दूरदर्शनच्या थेट प्रसारण सेवेतून १३ हजार फूट उंचीवरील पवित्र गुफेत ही पूजा व आरती होणार आहे. त्याचे प्रसारण रविवारी सकाळी ७ वाजेपासून होणार आहे.

दुसरीकडे वार्षिक यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी श्री अमरनाथ व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष व लेफ्टनंट गव्हर्नर गिरीश चंदर मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली ६ जुलै रोजी श्रीनगरमध्ये बैठक होऊ शकते. कोरोना महामारीचा विचार करता यंदा यात्रेचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. प्रसार भारतीचे सीईआे शशी शेखर यांनी ट्विट करून विशेष पूजेचे लाइव्ह प्रसारणाबद्दलची माहिती दिली. ते ट्विटद्वारे म्हणाले, पवित्र गुफेत होणाऱ्या विशेष आरतीचे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपणासाठी अमरनाथ मंडळ व प्रसारभारती एकत्र आले आहेत. त्यानुसार दूरदर्शनवर पहाटे ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता अर्ध्या तासासाठी आरतीचे प्रसारण केले जाणार आहे. थेट प्रक्षेपण ३ ऑगस्टपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत सुरू राहील. त्यासाठी दूरदर्शनची १५ जणांची टीम गुफा परिसरात राहणार आहे. रविवारी होणाऱ्या विशेष पूजा व आरतीमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर गिरीश चंदर मुर्मूदेखील सहभागी होतील. दुसरीकडे मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाने यंदा वार्षिक अमरनाथ यात्रा बालटालच्या मार्गे करण्याचे ठरवले आहे. यंदा पहलगामच पारंपरिकमार्गे यात्रा नसेल. बालटाल मार्गावर यात्रेकरूंच्या सुविधेसाठी चार हेलिपॅड बेस कॅम्प तयार करण्यात आले आहेत. स्टेेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एसडीआरएफ) काही तुकड्या या मार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह इतरही सुविधा निश्चित केल्या जातील. यात्रेच्या मार्गावर सामुदायिक पाकगृह चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केली जात आहे. गेल्या २ ऑगस्टला दहशतवाद्यांच्या धमकीनंतर आणि यात्रेच्या मार्गावर स्फोटके आढळल्यानंतर  यात्रा रोखण्यात आली होती. ६ जुलै रोजी मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यात्रेच्या तारखांशिवाय कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी कशी बाळगावी यावर चर्चा होणार आहे. सर्व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेशापूर्वी कोरोना स्क्रीनिंगमधून जावे लागणार आहे. त्यानंतर गुफेपर्यंत जाण्यासाठी यात्रेकरूंना इतर गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. काश्मीरच्या खोऱ्यातील १० पैकी ९ जिल्ह्यांत कोरोनाच्या संसर्गामुळे रेड झोन आहे. म्हणूनच बोर्ड यंदा यात्रा छोटेखानी स्वरूपात करणार आहे. जम्मू-काश्मिरात आतापर्यंत कोरोनाचे ८ हजार १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ हजार ८२५ अजूनही सक्रिय आहेत. १९९ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ३.४२ लाख यात्रेकरू पवित्र गुफेपर्यंत पोहोचले होते. २०१८ मध्ये २.८५ लाख व २०१७ मध्ये २.६० लाख भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. वास्तविक यंदा कोरोनामुळे यात्रेकरूंच्या संख्येत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

> जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेच्या मार्गावर सामुदायिक पाकगृह चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केली जात असून त्याचाही निर्णय होणार आहे.

> गेल्या २ ऑगस्टला अतिरेक्यांच्या धमकीनंतर आणि यात्रेच्या मार्गावर स्फोटके आढळल्यानंतर यात्रे रोखण्यात आली होती.

> कोरोनाचे ८ हजार १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ हजार ८२५ अजूनही सक्रिय आहेत. १९९ जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...