आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील चकमकीत सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन सदस्यांना ठार केले. पहलगाममधील श्रीचंद टॉप येथे दहशतवादी लपले असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती.
सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एक दहशतवादी संघटनेचा कमांडर होता, जो 2016 पासून सक्रिय होता.
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर चकमक -
जम्मू-काश्मीर श्री अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्याच्या तयारीत असतानाच ही चकमक झाली आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे पुढे ढकलल्यानंतर अमरनाथ यात्रा यावेळी पुन्हा सुरू होत आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. ही यात्रा 30 जून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेला यापूर्वीही अनेकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
कोकरनाग येथून एका दहशतवाद्याला अटक -
तत्पूर्वी, सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरातून एका हिजबुल दहशतवाद्याला अटक केली होती. मोहम्मद इश्फाक शेरगोजरी असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो नौगामचा रहिवासी आहे. इश्फाक हा सप्टेंबर 2017 पासून सक्रिय आणि सी-श्रेणीचा दहशतवादी होता, तो अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता.
बीएसएफला एक दिवसापूर्वी सांबामध्ये एक बोगदा सापडला होता -
गेल्या गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील चक फकिरा येथे बीएसएफ अधिकाऱ्यांना एक बोगदा आढळला होता. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. तर ही पाकिस्तानी चौकी चमन खुर्दपासून अवघ्या 900 मीटर अंतरावर आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी अलर्ट मोडवर आले आहेत.
या बोगद्यातून वाळूच्या 21 गोण्या सापडल्या आहेत. यांवर कोणत्याही प्रकारचे मार्किंग नाही. हा बोगदा नुकताच खोदण्यात आल्याचे दिसते. यापूर्वी बोगद्यातून सापडलेल्या पोत्यांवर कराची असे लिहिलेले होते. 2012 पासूम पाकिस्तान सीमेवर 11 बोगदे सापडले आहेत, असे बीएसएफचे आयजी डीके बोरा यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.