आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amarnath Yatra Cancelled 2021 | Amarnath Yatra Is Called Off Amid India Coronavirus Crisis

आस्थेवर महामारीचे सावट:कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांना घ्यावे लागणार ऑनलाइन दर्शन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे 2020 मध्येही ही यात्रा रद्द केली होती

देशात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 1 एप्रिलपासून यात्रेचे अॅडवांस रजिस्ट्रेशनदेखील सुरू झाले होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आली आणि यामुळे यात्रा रद्द करावी लागली. पण, भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी सांगितले की, वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 2020 मध्येही ही यात्रा रद्द केली होती. तसेच, 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 रद्द केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा मध्येच थांबवण्यात आली होती.

सर्वात अवघड तीर्थक्षेत्रांपैकी
अमरनाथ यात्रा सर्वात अवघट तीर्थ क्षेत्रांपैकी एक आहे. काश्मीरच्या बालटाल आणि पहलगामपासून ही यात्रा सुरू होते. अमरनाथ अनंतनाग जिल्ह्यात आहे. अमरनाथच्या गुफेत बर्फापासून नैसर्गित शिवलिंग तयार होते. तेथे जाण्याचा मार्ग अतिशय कठीण आहे. तरीदेखील सर्व समस्यांना तोंड देऊन दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. पण, यंदाही भाविकांना प्रत्यक्षात जाऊन दर्शन घेता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...