आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेची 11 पासून नोंदणी:दोन भक्त निवास तयार; खोऱ्यातील खराब वातावरणातही यात्रा सुरू राहील, मार्गात 3 भक्त निवासात 8500 लोक राहू शकतील

जम्मू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गात ३ भक्त निवासात ८५०० लोक राहू शकतील
अमरनाथ यात्रेसाठी ११ एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल. कोविडमुळे दोन वर्षांपासून यात्रा बंद होती. आता ४३ दिवसांची यात्रा ३० जून रोजी सुरू होऊ शकते. अशात यात्रेकरूंच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कंबर कसली आहे. उंच ठिकाणांवरील बर्फ हटवण्याचे काम सुरू केले आहे. यानंतर मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल.

पवित्र गुहेच्या मार्गात भाविकांना थांबण्यासाठी यात्रेकरू निवासाचे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. रामबन जिल्ह्यात चंद्रकोट भक्त निवासाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. येथे एका वेळी ३२०० भाविक थांबू शकतील. श्रीनगरमध्ये पंथा चौकानजीक भक्त निवासाचे काम सुरू आहे. यात सुमारे २२५० यात्रेकरू थांबू शकतील. याशिवाय जम्मूत ३००० क्षमतेच्या भक्त निवास परिसरही व्यवस्थित केला जात आहे. या भक्त निवासात भाविकांना थांबण्यासाठी वेळ मिळेल. यासोबत अचानक बदलणाऱ्या वातावरणाच्या स्थितीत संपूर्ण यात्रा स्थगित होणार नाही. जम्मूहून यात्रेकरूंना रामबन स्थित भक्त निवासाकडे पाठवले जाऊ शकते. याच पद्धतीने श्रीनगरहून गुहा मंदिराकडे टेंट सिटीपर्यंत यात्रा वाढवली जाऊ शकते. याशिवाय बर्फवृष्टीदरम्यान रामबनच्या आसपास महामार्गावर अडकणाऱ्या ट्रक चालकांसाठी हे भक्त निवास वरदान ठरू शकते.

तापमानात दीर्घकाळ शिवलिंग टिकवणे मोठे आव्हान
बोर्डासमोर या वर्षी वाढते तापमान पाहता बर्फाचे शिवलिंग दीर्घकाळ टिकवणे मोठे आव्हान आहे. गुहेतील तापमान ४-५ डिग्री ठेवावे लागेल. त्यासाठी गाभाऱ्यात मोठ्या संख्येने तीर्थयात्रेकरूंची ये-जा रोखावी लागेल. शरीरातील उष्णतेमुळे तापमान १० डिग्रीपर्यंत पोहोचून शिवलिंग वितळते.

रामबन जिल्ह्यातील भक्त निवासाचे हे चित्र. एलजी मनोज सिन्हा लवकरच त्याचे उद्घाटन करतील.

बातम्या आणखी आहेत...