आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amazon To Retire Prime Now, Allows 2 Hour Deliveries On Main App; News And Live Updates

अमेरिकन कंपनीची नवीन रणनीती:अ‍ॅमेझॉनचा प्राइम नाऊ डिलिव्हरी अ‍ॅप होणार बंद, मुख्य अ‍ॅपवरच दोन तासांत मिळेल डिलिव्हरीचा पर्याय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राइम नाऊ अ‍ॅप अ‍ॅमेझॉनने 2014 मध्ये लॉन्च केले होते

अमेरिकन दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने धोरणात्मक दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीने आपले स्टँडअलोन प्राइम नाऊ डिलिव्हरी अॅप बंद केले जाणार आहे. आता ग्राहकांना दोन तासांच्या डिलिव्हरीचा पर्याय कंपनीच्या मुख्य अ‍ॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अॅमेझॉनने 2014 मध्ये प्राइम नाऊ हे अॅप लाँच केले होते.

अनेक देशांमध्ये यापूर्वीच प्राइम नाऊ अॅप बंद
कंपनीने यापूर्वीच भारत, जपान आणि सिंगापूर देशांमध्ये हे अॅप आणि संकेतस्थळाला बंद केले होते. पर्यायी व्यवस्था म्हणून कंपनीने मुख्य अॅपवरच प्राइम नाऊचा अनुभव उपलब्ध करुन देण्यास सुरवात केली आहे. अमेरिकेत 2019 मध्ये फ्रेश आणि होल फूड्स मार्केटने दोन तासांत डिलिव्हरी पर्याय कंपनीने सुरु केला.

सर्व सेवा एकाच अॅपवर उपलब्ध होणार
कंपनीने खरेदी, ऑर्डरचा मागोवा घेणे आणि कस्टमर केअरशी संपर्क साधणे यासारख्या सर्व सेवांसाठी एकच सोयीस्कर अ‍ॅप तयार केला गेला आहे. दररोजच्या भेटवस्तू, गिफ्ट, खेळणी, उच्च प्रतीचे किराणा सामान आणि प्राइम नाऊवर मिळत असलेल्या सर्व वस्तू आता अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध राहणार असल्याचे लँड्री यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...