आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणातील अंबालामधील शहजादपूर भागातील मुख्य बाजारपेठेत सोमवारी एका वळूने दहशत घातली. बाजारपेठेतील अनेक दुकानदारांवर वळूने हल्ला केला. त्यामुळे या भागात एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, ही घटना दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय दिसून आले सीसीटीव्हीत
एक व्यक्ती दूध घेऊन पायी जात होती. तेव्हा त्या व्यक्तीला पाहून वळू उभा राहतो. ती व्यक्ती जवळ येताच वळूने त्याला मारण्यास सुरुवात केली, त्याला खाली पाडले.
वळूने व्यक्तीला जमिनीवर खाली पाडून 4 ते 5 मिनिटे सतत शिंग मारले. जमिनीवर आपटू आपटू मारले. ती व्यक्ती मोठ्याने आवाज देत होती. अखेर एक जण काठी घेऊन त्याच्याकडे धावत आला. त्याने काठीने वळूला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आणि जखमी व्यक्तीची सुटका केली. त्या व्यक्तीच्या शरीराला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.
दुकानदार थोडक्यात बचावला
तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये वळू धावताना दिसला आणि त्यात एका शटर जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीला मारताना दिसत आहे. शटरला लागून असलेल्या भिंतीला धडक दिली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या वळूने यापूर्वी देखील 5 दुकानदारांना जखमी केल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
वळूने अनेकांना लक्ष्य केले
शहजादपूरच्या मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक रमेश हे आपल्या दुकानाचे शटर उघडत होते. तेव्हा वळूने त्यांच्यावर हल्ला केला आहे. यात रमेश देखील जखमी झाले. अंबाला कॅंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी दूध खरेदीसाठी जाणाऱ्या सोहनलाल यांच्यावर देखील वळूने हल्ला केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.