आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amel Kolhe's Anger Was Muffled While Asking For An Answer To Chhatrapati's Insult

छत्रपतींच्या अवमानाचा जाब विचारताना आवाज दाबला:लोकसभेतील कृतीबाबत अमाेल काेल्हेंचा संताप

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत आहेत. अशी व्यक्ती कोणीही असो, तिच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. तसा कायदा करावा, अशी मागणी उद्धवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी गुरुवारी लोकसभेत केली. पण छत्रपतींच्या अवमानाबाबत जाब विचारत असताना खासदार अमोल कोल्हेंचा माइक बंद करून तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

उद्धवसेनेचे विनायक राऊत यांनी सुरुवातीला हा विषय मांडला. अवमानकारक वक्तव्य करणारा घटनात्मक पदावर असला तरी कारवाई व्हावी, असे ते म्हणाले. त्यानंतर खा. कोल्हे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. ते देव नसले तरी शिवभक्तांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये वारंवार केली जात आहेत.’ कोल्हे हे बोलत असताना त्यांचा माइक बंद करून कामकाज तहकूब करण्यात आले. त्यावर कोल्हेंनी ‘शिवभक्तांचा आवाज बंद करता येणार नाही, तो कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा देत संताप व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...