आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केटबॉलपटूसाठी ‘मर्चेंट ऑफ डेथ’ची सुटका:अबूधाबी विमानतळावर अमेरिका-रशियाकडून कैद्यांची अदलाबदली

अबूधाबी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-अमेरिकेने आपापल्या तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या एकमेकांच्या 2 कैद्यांची सुटका केली आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्र डीलर व्हिक्टर बाउटची सुटका केली. तर त्या मोबदल्यात रशियाने अमेरिकेचा बास्केटबॉलपटू व ऑलिंपिक मेडलिस्ट ब्रिटेनी ग्रिनरची सुटका केली.

या दोन्ही कैद्यांना एका खासगी विमानाने यूएईच्या अबूधाबी विमानतळावर आणण्यात आले होते. रशियन माध्यमांनी या कैद्यांच्या अदलाबदलीचा एक व्हिडिओही जारी केला आहे. त्यात हे दोन्ही कैदी विमानतळावरून उतरून आपापल्या देशांच्या अधिकाऱ्यांसोबत मायदेशी परतताना दिसून येत आहेत.

ब्रिटेनी ग्रिनरने अमेरिकेसाठी दोनवेळा ऑलिंपिकचे पदक जिंकले आहे.
ब्रिटेनी ग्रिनरने अमेरिकेसाठी दोनवेळा ऑलिंपिकचे पदक जिंकले आहे.

ब्रिटेनीकडे आढळले होते प्रतिबंधित कॅनाबीस ड्रग

रशियाने गतवर्षी फेब्रवारी महिन्यात ग्रिनरला प्रतिबंदित कॅनाबीस ऑयलसोबत मॉस्को विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये बायडेन प्रशासनाने तिच्या सुटकेच्या मोबदल्यात व्हिक्टर बाउटच्या सुटकेचा प्रस्ताव ठेवला होता. रशियालाही बाउट हवा असल्याचे अमेरिकेला ठावूक होते. ब्रिटेनी अमेरिकेला पोहोचल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एक निवेदन जारी केले. ते म्हणाले - ब्रिटेनी ग्रिनर सुरक्षित असल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.

‘मर्चेंट ऑफ डेथ’ रशियाला पोहोचला

व्हिक्टर बाउट मागील 12 वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात होता. त्याला जगभरात अवैधपणे शस्त्र निर्यातीप्रकरणी मर्चेंट ऑफ डेथ म्हणजे मौत का सौदागर म्हणून ओळखले जाते. अमेरिकेच्या कैदेतून सुटून रशियाला पोहोचलेल्या बाउटने सांगितले की, मला मध्यरात्री उठवून आपले सामान पॅक करण्याचे सांगण्यात आले. वृत्तानुसार, रशियाला पोहोचल्यानंतर बाउट विमानातून हाती फुलांचा गुलदस्ता घेऊन उतरला. तिथे त्याची पत्नी व आई उपस्थित होती.

व्हिक्टर बाउटवर अल कायदा व तालिबानलाही अवैधपणे शस्त्र पोहोचवल्याचा आरोप आहे.
व्हिक्टर बाउटवर अल कायदा व तालिबानलाही अवैधपणे शस्त्र पोहोचवल्याचा आरोप आहे.

UAEच्या मध्यस्थीवर अमेरिकेचा नकार

UAE व सौदीने एका निवेदनाद्वारे या प्रकरणी सौदी क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. पण व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवांनी हे वृत्त फेटाळले आहे. या सौद्यात रशिया व अमेरिकेशिवाय तिसरा कोणताही पक्ष नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रिंस मोहम्मद बिन सलमान हे रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी गत सप्टेंबर महिन्यात रशिया व युक्रेनमध्ये झालेल्या कैद्यांच्या अदलाबदलीतही महत्त्वाची भूमिका निभावली होती.

USला व्हिक्टरच्या मोबदल्यात माजी सैनिकाचीही सुटका हवी होती

व्हिक्टर बाउटच्या सुटकेसाठी अमेरिकेची केवळ ब्रिटेनी ग्रिनरच नव्हे तर आपल्या एका माजी सैनिकाची सुटका करण्याचीही इच्छा होती. रशियाने माजी नौदल अधिकारी पॉल व्हीलन यांचीही सुटका करावी अशी अमेरिकेची इच्छा होती. पण रशियाने ही मागणी फेटाळली. पॉल व्हीलन 20187 पासून रशियाच्या तुरुंगात बंदिस्त आहे. त्याच्यावर हेरगिरीचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...