आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • America Will Send A 1 Lakh Kg Spacecraft Into Space, 8 People From Japan Will Be On The Moon At The Same Time

दिव्य मराठी विशेष:अमेरिका अंतराळात पाठवणार 1 लाख किलोचे यान, जपानचे 8 जण एकाच वेळी चंद्रावर

वृत्तसंस्था | वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2023 मध्ये जगातील 5 मोठ्या मोहिमांतून अंतराळाबद्दलचा दृष्टिकोन बदलणार
  • भारताचे थ्रीडी प्रिंटेड रॉकेटही झेपावणार

२०२३ हे वर्ष अंतराळ तंत्रज्ञानासाठी सुवर्णयुग मानले जाते. कारण आहे- ५ मोठ्या मोहिमा. यातून सामान्यांचा अंतराळाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. युरोपीय अंतराळ संस्थेची ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर, सुपर हेवी स्पेसएक्स स्टारशिप झेपावेल. जपानचे ८ सदस्यीय दल असलेले मिशन डियरमून. नासाच्या यानाची लघुग्रह नमुन्यासह पृथ्वीवर परतणी. भारताची खासगी स्पेस कंपनी स्कायरूटचे पहिले थ्रीडी प्रिंटेड रॉकेटसह उपग्रह झेपावणार आहे.

स्पेसएक्सचे सुपरहेवी स्टारशिप स्टारशिप एक लाख किलोच्या कार्गोला पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थापन करेल. त्यात दोन घटक असतील. अंतराळ यान व सुपर हेवी रॉकेट. ३९ शक्तिशाली इंजिनातून तयार रॉकेट यानास ६५ किमी उंच घेऊन झेपावेल.

जपानचे ‘डियरमून’ अभियान जपानचे आठ सदस्यीय चमू स्पेसएक्स स्टारशिपने चंद्रावर जातील. हा चमू चंद्राच्या चोहीबाजूने परिक्रमा करून त्याच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यात यश आल्यास डीप स्पेस टुरिझमच्या भविष्याचा अंदाज लावता येणार आहे.

ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर जगातील पहिले रोबोटिक ज्युपिटर मिशन. चंद्राच्या चोहीबाजूने चार वर्षे परिक्रमा केल्यानंतर ते २०३१ मध्ये ज्युपिटरवर पोहोचेल. त्याचे रडार येथील पृष्ठभागावरील बर्फ व गॅसचा शोध घेतील. लाँचिंग : एप्रिलअखेरीस.

लघुग्रहाचे नमुने मिळणार नासाचे आेसीरिस पृथ्वीजवळ बेन्नू लघुग्रहाचे नमुने घेऊन २४ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील युटाच्या वाळवंटात परतेल. त्यावर सोने, प्लॅटिनमसह अनेक मौल्यवान धातूंचा साठा आहे. पाणी असल्याचेही खगोलतज्ज्ञांना वाटते.

स्कायरूटचे थ्रीडी प्रिंटेड रॉकेट भारताची पहिली खासगी स्पेस कंपनी स्कायरूट यंदा आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करेल. त्याचे उद्दिष्ट थ्रीडी प्रिंटेड रॉकेटचे उत्पादन वाढवून खासगी प्रक्षेपणाचा खर्च कमी करेल. दोन खासगी कंपन्याही यंदा रॉकेट लाँच करतील.

बातम्या आणखी आहेत...