आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • American Airlines Pees Case; New York Delhi Flight | American Airlines Flight | America

अमेरिकन एअरलाइन्समध्ये लघुशंका कांड:मद्यधुंद विद्यार्थ्याने शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका, न्यूयॉर्क-दिल्ली विमानातील घटना

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधिकाऱ्यांनी सांगितले की फ्लाइट 292 मधील एक अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी दारूच्या नशेत प्रवास करत होता. (फाईल फोटो) - Divya Marathi
अधिकाऱ्यांनी सांगितले की फ्लाइट 292 मधील एक अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी दारूच्या नशेत प्रवास करत होता. (फाईल फोटो)

अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने (विद्यार्थ्याने) शेजारी असलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली. ही घटना 3 मार्चला घडली असून हे प्रकरण समोर आले आहे. हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत होते. या घटनेनंतर लघुशंका करणाऱ्याने माफी मागितल्याचे एअरलाइन कंपनीचे म्हणणे आहे.

दिल्ली विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लाइट-292 मध्ये अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी दारूच्या नशेत प्रवास करत होता. झोपेत त्याने लघुशंका केली. ज्यामुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर लघुशंका गेल्याने त्या प्रवाशाने कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली.

विद्यार्थ्याने प्रवाशाची माफीही मागितली एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 3 मार्च रोजी रात्री 9.16 वाजता न्यूयॉर्कहून विमानाने उड्डाण केले. 14 तास 26 मिनिटांच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. लघुशंका करणाऱ्या विद्यार्थ्याने पीडित प्रवाशाची माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार पोलिसांना देण्यात आली नाही. मात्र क्रूला कळल्यावर त्यांनी पायलटला ही माहिती दिली.

4 मार्च रोजी सकाळी 10:12 वाजता विमान दिल्ली विमानतळावर उतरले. तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सीआयएसएफच्या जवानांनी आरोपीला दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर विमानातून उतरताच पकडले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

26 नोव्हेंबर रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले विमानात प्रवाशाने लघुशंका करण्याची ही तिसरी घटना आहे. सर्वप्रथम, असे प्रकरण 26 नोव्हेंबर 2022 रोजी उघडकीस आले. त्यानंतर शेखर मिश्रा नावाच्या आरोपीने न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या प्लाइटमध्ये एका वृद्ध महिलेवर एका बिझनेस मॅनने लघुशंका केली होती.

6 डिसेंबर रोजी पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. महिलेने पोलिसात गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. त्यामुळे सीआयएसएफ आणि कस्टमने त्यांची औपचारिकता पूर्ण करून आरोपींना सोडून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...