आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amfan Cyclone Hit Bengal And Odisa | NDRF Evacuates Many Areas Due To Super Cyclone Amfan Waves 15 Feet High In The Sea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल-ओडिशात अंफन धडकले:वादळाच्या प्रचंड वेगामुळे लाटांचे पाणी 13 किमी भूभागात घुसले, 12 जणांचा मृत्यू, 5 हजार घरांचे नुकसान

कोलकाता/ भुवनेश्वरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुसळधार पावसात ताशी 190 किमी वेगाने सुसाट वारा, प्रचंड नुकसान
  • तयारी कामी आली : 6.6 लाख लोक हलवले होते

अंफन हे भयंकर चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी प. बंगाल व ओडिशा किनारपट्टीवर धडकले. वादळाने दोन्ही राज्यांत प्रचंड नुकसान झाले. ताशी १९० किमी वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक भागांत हाहाकार माजला. शेकडो झाडे तसेच विजेचे खांब उन्मळून पडले. यात दोन्ही राज्यांत मिळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प. बंगालमध्ये ५ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले. ओडिशा किनारपट्टीलगत कच्ची घरे पडली. हवामान खात्यानुसार, बुधवारी दुपारी हे वादळ प. बंगालच्या दिघा आणि बांगलादेशच्या हटियादरम्यान किनारपट्टीवर धडकले. यामुळे समुद्रात ५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. हे पाणी भूभागावर १३ किमी आत घुसले.

फिजिकल डिस्टन्सिंग, पीपीई किटसह पथके बचावात कार्यरत

जेकब किसपोट्‌टा | कमांडंट, एनडीआरएफ, ओडिशा

मी बालासोर कॅम्पवर होतो. रविवारीच आम्ही लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात पाठवण्यास सुरू केले होते. १.६ लाख लोकांना हलवण्यात आले. कोविड-१९ च्या संकटात या निवाऱ्यांत काम करणे आव्हान होते. या निवाऱ्यांत फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. सर्व पथके पीपीई किटसह बचावकार्यात आहेत. अगोदरच तयारी केली होती म्हणून बचावकार्य सोपे झाले.

बंगालमध्ये ३ दिवसांत ५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

निशित उपाध्याय | कमांडंट, एनडीआरएफ, प बंगाल

मी प. बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात काकद्वीपहून सर्व एजन्सींशी समन्वय ठेवून काम करत आहे. आम्ही ३ दिवस ५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी तात्पुरत्या निवाऱ्यांत हलवले. त्यामुळे जीवितहानी कमी झाली. समुद्राच्या लाटा सागरद्वीपमध्ये १३ किमी आत आल्या होत्या. सायंकाळी साडेसातला वाऱ्याचा वेग मंदावला. मात्र, ३-४ तासांत वादळाने प्रचंड नुकसान केले होते.

(जेकब किसपोट्‌टा आणि निशित उपाध्याय यांनी अनिरुद्ध शर्मा यांना दिलेली माहिती.)

बातम्या आणखी आहेत...