आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. याआधीच काही वृत्तांमध्ये पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जातोय ही सोनिया गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांना या पदावर राहण्याची इच्छा नाही. मात्र काँग्रेसने या वृत्ताचे खंडन केले आहे. सोनिया गांधींच्या राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
उद्या, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. याच बैठकीत नवीन अध्यक्षाबाबत निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.
पक्षाच्या नेत्यांनी एक पत्र लिहून बदल करण्याची मागणी केली
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. ज्यांनी हे पत्र लिहिले त्यांच्यात 5 माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा यांचा समावेश आहे. या मुद्द्यावरून सोमवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे.
पत्रात काय आहे?
भाजप सातत्याने पुढे जात असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदींना जोरदार मतदान केले. काँग्रेसचा बेस कमी असल्यामुळे आणि तरुणांचा आत्मविश्वास तुटत असल्याबद्दल गंभीर चिंता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे 15 दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्राने बदलाचा असा अजेंडा दिला आहे, ज्यांची चर्चा सध्याच्या नेतृत्वाला खुपू शकते.
या 3 मागण्यांचा उल्लेख
लीडरशिप फुल टाइम आणि प्रभावी असावी, जी फिल्डमध्ये अॅक्टिव्ह असेल. त्याचा परिणामही दिसावा.
काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक घ्यावी.
संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने तयार करावी जेणेकरून पक्षाला नवजीवन मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
अमरिंदर सिंह म्हणाले - गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणे चुकीचे
यादरम्यान पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी रविवारी म्हटले की, अंतर्गत निवडणुकांऐवजी प्रत्येकाची संमती घेतली पाहिजे. राहुल गांधींनी कार्यकर्त्यांचे पूर्ण समर्थन आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत की नाही, याचा काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणार्या नेत्यांचा विरोध दर्शविला आहे.
उद्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या महिन्यात आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. गेल्या वर्षी राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक होईल. यात नेतृत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते
असे म्हटले जात आहे की, पक्षाच्या एका गटाला पुन्हा राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवायचे आहे. पक्षाने 2 दिवसांपूर्वी मीडिया ब्रीफिंगमध्ये म्हटले होते की देशभरातील कार्यकर्त्यांना राहुल यांना अध्यक्षपदी बघण्याची इच्छा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.