आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Abhishek Banerjee News And Updates | Union Home Minister Amit Shah Summons By Special Court In Defamation Case Filed By Mamata Banerjee Nephew

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालच्या कोर्टाचा गृहमंत्र्यांना समन:अमित शहांना 22 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले; तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी मानहाणी प्रकरणात समन

कोलकाता10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित शहांनी एका रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते

पश्चिम बंगालमधील बिधाननगरच्या स्पेशल कोर्टानेने केंद्रीय गृह मंत्री अमित शहांना 22 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन बजावला आहे. हा समन TMC खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींच्या मानहाणी प्रकरणात पाठवला आहे. कोर्टाने शहा यांना म्हटले की, स्वतः हजर रहा किंवा आपला वकील पाठवा.

काय आहे प्रकरण ?

11 ऑगस्ट 2018 ला कोलकातामध्ये एका रॅलीदरम्यान शहा यांच्या वक्तव्याचा विरोध करत अभिषेक बॅनर्जी यांना शहांविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला होता. शहा त्या रॅलीमध्ये म्हणाले होते की, 'ममता बॅनर्जी यांच्या काळात नारदा, शारदा, रोज व्हॅली, सिंडिकेट करप्शन, भाच्चा करप्शन झाले.' अभिषेक यांनी आपल्या तक्रारीत अजून एका वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. यात शहा म्हणाले होते की, 'बंगालच्या गावातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 लाख 59 हजार कोटी पाठवले होते, ते कुठे गेले ? हे पैसे भाच्चा आणि सिंडिकेटला गिफ्ट केले.'

बातम्या आणखी आहेत...