आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शाह एम्समध्ये दाखल:केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे एम्सने केले स्पष्ट, आठ दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अमित शाह यांना मंगळवारी सकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे वृत्त आहे. आठ दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

शाह यांना रात्री उशीरा 2 वाजता एम्समध्ये दाखल करण्ययात आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात त्यांची टीम शाहांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

एम्सने सांगितले की, ते बरे आहेत आणि रुग्णालयातून काम करत आहेत

अमित शाह यांनी ट्विट करुन दिले होते कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त
कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण दिसेल्यानंतर मी टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत बरी आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो की, जे लोक काही दिवसांपूर्मी माझ्या संपर्कात आले आहेत. कृपया त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन तपासणी करुन घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...