आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BSF च्या कार्यक्रमात गृहमंत्री:शहा म्हणाले - ड्रोन आणि बोगद्यांच्या माध्यमातून देशाविरोधात कट रचला जातोय; आपण प्रत्येक आव्हानासाठी तयार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तो देश सुरक्षित आहे.

शनिवारी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) 18 व्या अलंकरण सोहळ्यात गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजेंस ब्युरोचे संचालक अरविंद कुमार हे या वेळी उपस्थित होते. यादरम्यान शहा यांनी नाव न घेता पाकिस्तानला कठोर संदेश दिला.

ते म्हणाले की ज्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तो देश सुरक्षित आहे. आपण पाहिले ड्रोन पाठवले जात आहे. बोगदे बनवण्यात आले, परंतु या आव्हानांना आपण तयार आहोत. देशाविरूद्ध केलेल्या प्रत्येक कटाचे उत्तर दिले जात आहे. बीएसएफ चीफ राकेश अस्थाना येथे बसले आहेत. त्यांची टीम बोगदे शोधून काढल्यानंतर आणि सर्व विश्लेषण करुन बोगदा किती दिवसांपूर्वी तयार झाला असेल? किती लोक प्रवेश केला असेल? हे शोधून काढून शक्य तितक्या लवकर समस्येचे निदान करते.

शहांच्या संबोधनातील महत्त्वाची गोष्टी
1. जवानांचे बलिदान विसरता येणार नाही

गृहमंत्री शहा म्हणाले की ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्यांना मी अभिवादन करतो. आपण सतर्क राहून देशाच्या सीमांचे रक्षण करत आहोत हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे, म्हणूनच आज देश लोकशाहीने अवलंबलेल्या विकासाच्या मार्गावर जात आहे. त्या बलिदान करणाऱ्यांना कधीच विसरु शकत नाही.

2. सीमा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा आहे
सीमा सुरक्षा कार्यात व्यस्त असलेल्या बीएसएफ आणि सर्व निमलष्करी दलामुळे आज भारत जगाच्या नकाशावर आपले अभिमानास्पद स्थान नोंदवत आहे. सीमा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मला माझ्या निमलष्करी दलांवर पूर्ण विश्वास आहे.

3. आमचे एक स्वतंत्र संरक्षण धोरण
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आमचे स्वतंत्र संरक्षण धोरण आहे. याअंतर्गत, जो आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान करतो त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आज, भारत कोणासमोर झुकत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोपरि मानत असलेल्या आव्हानांचा सामना करतो.

2003 पासून प्रत्येक वर्षी होतोय समारंभ
BSF चा अलंकरण सोहळा दरवर्षी 2003 पासून BSF चे पहिले महासंचालक आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त केएफ रूस्तमजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला जातो. यावर्षी हे कोरोना महामारीमुळे याचे आयोजन आज करण्यात येत आहे.

या वर्षी 27 जवानांचा सन्मान करण्यात आला. त्यापैकी 14 जणांना वीरतेसाठी पोलिस पदक आणि 3 सेवानिवृत्तीसह 13 जणांना कौतुकास्पद सेवा देण्यासाठी पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...