आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेठा प्रश्न:शहा एम्समध्ये का नाहीत भरती : काँग्रेस, साेनियाही विदेशात गेल्या हाेत्या : भाजप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय रुग्णालयात उपचार का करत नाहीत नेते

रोना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. थरूर यांनी ट्विट केले की, आश्चर्य आहे, आजारी झाल्यावर गृहमंत्र्यांनी उपचारासाठी एम्स नव्हे तर शेजारच्या राज्यातील एका खासगी रुग्णालयाची निवड केली. सार्वजनिक संस्थांवर सामान्य लोकांचा विश्वास वाढावा, यासाठी त्यांना प्रभावशाली लोकांचे पाठबळ मिळायला हवे. यावर तेलंगणा भाजपचे मुख्य प्रवक्ते कृष्णसागर राव यांनी थरूर यांना उत्तर दिले. राव यांनी ट्विट केले, थरूर यांचे वक्तव्य वाईट आहे. उपचाराची जागा निवडणे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही कर्करोगावर उपचारासाठी विदेशात गेल्या होत्या. तेव्हा भाजपने असे वक्तव्य केले नव्हते. सोनिया गांधींनी त्यांच्या नेत्यांना असे वक्तव्य करण्यापासून रोखावे. कोरोनाबाधित झाल्यानंतर शहा यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिकडे अमेरिकेत... तज्ज्ञांचा इशारा- घरातही मास्क घाला, तेव्हाच थांबेल कोरोना
अमेरिकेत व्हाइट हाऊस कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. डेबोरा बिक्स यांनी सांगितले की, अमेरिकेत कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. आम्ही कोरोनाचा सामना करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. लोकांनी घरातही मास्क वापरावा. सहायक आरोग्य सचिव ब्रेट गिरयर यांनीही सांगितले, कोरोनाच्या नियंत्रणासाठी ९० टक्के लोकांनी मास्क घालावा. अमेरिकेत कोरोनाचे ४८ लाख १४ हजार ४४० रुग्ण आढळले आहेत. तर १ लाख ५८ हजार ३७५ मृत्यू झाले आहेत.

संसर्ग : चिदंबरम यांचे पुत्र व येदियुरप्पांची मुलगी पॉझिटिव्ह, प्रसाद क्वॉरंटाइन
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र व काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम कोरोनाबाधित झाले. कार्ती यांनी ट्विट करत पुष्टी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पांची मुलगी बी. वाय. पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह झाली. येदियुरप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्रही क्वॉरंटाइन झाले आहेत. येदियुरप्पा कार्यालयातील सहा कर्मचारी बाधित झाले आहेत. दरम्यान, गृहमंत्री शहा यांची भेट घेतल्याने माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद होम क्वॉरंटाइन झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...