आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्र्यांना कोरोना:अमित शाह यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी; राहुल गांधींनी शाहंसाठी केली प्रार्थना

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या. दरम्यान राहुल गांधी यांनीही ट्वीटरवरुन अमित शाह यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली.

काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, "अमित शाह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो."

अमित शाह यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याआधी अमित शाह यांनी ट्वीट करुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. 'कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी टेस्ट केली आहे. यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी रुग्णालयात दाखल होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, जे लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन तपासणी करुन घ्यावी,' असे अमित शाह म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...