आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध कोरोनाविरुद्ध:अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह; यूपीच्या एकमेव मंत्री महिला कमल राणी यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहा बुधवारी कॅबिनेट बैठकीत नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण यांच्यासह 20 केंद्रीय मंत्र्यांसोबत होते

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. “कोरोनाची लक्षणे दिसू लागली म्हणून चाचणी केली, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी विलगीकरण पाळून चाचणी करावी,’ असे ट्विट शहा यांनी केले. यानंतर शहा यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमल राणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन झाले. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तामिळनाडूत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह राजभवनातील ८७ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे.

अमित शहा २२ जुलैला अडवाणींना, तर १ ऑगस्टला अनेक भाजप नेत्यांना भेटले होते

शहा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, येथे सहा फुटाचे अंतर पाळले गेले होते. शहा पंतप्रधान मोदींना भेटले होते की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

> १ ऑगस्टला पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्यासोबत शहा व्यासपीठावर होते. २२ जुलैला ते अडवाणींना भेटले होते.

> आरोग्य मंत्रालयानुसार, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनी किमान ७ दिवस क्वाॅरंटाइन राहायला हवे. सात दिवसांनंतर काेरोना चाचणी करणेही गरजेचे आहे.

तज्ञांचे मत :

४५ मिनिटांहून अधिक काळ एकत्र बसलात तर सहा फूट अंतर ठरते कुचकामी दिल्लीतील वैद्यकीय तज्ञ डॉ. स्वाती माहेश्वरी यांच्यानुसार, एखादी व्यक्ती ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ कोरोनाबाधित व्यक्तीसोबत बसली असली तर तिला कोरोना होण्याचा धाेका वाढतो. कारण, शहा उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळाची ती बैठक बंद खोलीत दीड तास चालली होती. म्हणून हा धोका अधिक वाटतो. बंद खोलीत विषाणूचे कण हवेत तरंगू लागतात. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केले आहे की, कोरोनाचे हे कण हवेत खूप वेळ राहतात.

देशात प्रथमच रविवारी एका दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली. रविवारी सर्वाधिक ६०,३९१ रुग्ण आढळले. ८५७ मृत्यू झाले. यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३८,१०६ झाली. मृत्यूंचा विचार करता भारत जगात पाचव्या स्थानी आहे. दुसरीकडे रविवारी देशात ४८,६१३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही संख्याही आजवरची सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...