आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी खासदाराने मध्येच टोकल्याने शहांनी भाषण थांबवलं:म्हणाले- तुमच्या वयाला आणि ज्येष्ठतेला हे शोभत नाही, विषयाचे गांभीर्य समजून घेतलं पाहिजे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत देशातील अंमली पदार्थ आणि तस्करी रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. यादरम्यान तृणमूल काँग्रेस खासदार सौगता रॉय हे मधातच टोकत असल्याने अमित शहा यांनी आपले भाषण संपल्यानंतर बोलण्यास सांगितले. मात्र, सौगत रॉय यांचे बोलणे सुरूच राहिल्याने त्यांचा पारा चढला आणि 'दादा (सौगता रॉय) तुम्हीच बोला' असे म्हणत शहा खुर्चीवर बसले.

तुमचे वय आणि ज्येष्ठता पाहता एका खासदारला असे वागणे शोभत नाही. विषयाचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असे शाह म्हणाले. तसेच शाह तुम्ही रागवत आहात असा सभागृहातून आवाज आल्यानंतर मला राग येत नाही, तर मी समजावून सांगत आहे. कधी आपल्या मोठ्यांनाही समजावून सांगावे लागते, असे म्हणत त्यांनी पुन्हा भाषणास सुरवात केली.

अमित शहा म्हणाले की, ड्रग्जच्या समस्येवर राजकारण करू नये. अंमली पदार्थांचे व्यसन ही आपल्या प्रजाती नष्ट करणारी समस्या आहे. पंतप्रधान मोदींनी देशासमोर अमली पदार्थमुक्त भारताचा संकल्प ठेवला आहे. या देशात ड्रग्जच्या विरोधात बरीच कारवाई झाली आहे. अंमली पदार्थांनी देश पोकळ केला. मोदी सरकारने अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारले आहे. मंगळवारी हरसिमरत कौर यांनी पंजाबमध्ये पसरणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अमित शहा यांनी आपले म्हणणे मांडले.

विरोधी पक्षाचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने

संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी निदर्शने केली. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पी.चिदंबरम उपस्थित होते.
संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी निदर्शने केली. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पी.चिदंबरम उपस्थित होते.

विरोधकांचे वक्तव्य...

तवांग संघर्षावर पंतप्रधानांनी मौन सोडावे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पंतप्रधानांनी या प्रश्नावर संसदेत येऊन उत्तर द्यावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, आम्ही लष्करावर टीका नसून लष्करासोबत आहोत, पण प्रश्न देशाच्या राजकीय नेतृत्वाचा आहे. आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की सरकारने सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करावी आणि देशातील जनतेला विश्वासात घ्यावे.

काँग्रेस अध्यक्षांसोबत पंतप्रधान मोदींचं लंच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेच्या आवारात मंगळवारी खासदारांसाठी भोजनाची व्यवस्था केली. यावेळी भाजप नेत्यांसोबत काँग्रेस नेतेही जेवण करताना दिसले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींसोबत दुपारचे जेवण घेतले. पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्याचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र, भोजनापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांना श्वानाच्या वक्तव्यावरून भाजपने कोंडीत पकडले. भाजपने खरगे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर मी जे बोललो ते सभागृहाबाहेर बोललो असे खरगे म्हणाले. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...