आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Health: Amit Shah On Health And Social Media Rumours, I Am Fit And Fine Says Home Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा म्हणाले-:मी पूर्णपणे निरोगी, मला कुठलाही आजार झालेला नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची स्पष्टोक्ती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देश कोरोनाशी लढत आहे, व्यस्त असल्याने मी अफवांवर लक्ष देत नाही -गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोग्यावरून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा उठल्या आहेत. त्यांना काही आजार झाला असावा अशीही चर्चा सुरू होती. परंतु, स्वतः शहांनी आपल्या ट्विटर हँडलवर याचे स्पष्टीकरण जारी करताना या सर्व केवळ अफवा असल्याचे सांगितले. सोबतच, आपण सुखरूप असून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार झालेला नाही असेही अमित शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

अमित शहा म्हणाले- 

ट्विटमध्ये अमित शहा म्हणाले, की मला कुठलाही आजार झालेला नाही. मी पूर्णपणे सुखरूप आहे. "गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या आरोग्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा उठल्या आहेत. काहींनी तर माझ्या मृत्यूवर प्रार्थना करण्याचे आवाहन सुद्धा केले. देश सध्या कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढत आहे आणि देशाचे गृहमंत्री या नात्याने कामात व्यस्त असल्याने मी याकडे लक्ष देत नाही. सगळेच आपल्या काल्पनिक विचारांतून आनंद लुटत असल्याचे पाहून मी काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. परंतु, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी गेल्या दोन दिवसांपासून खूप चिंतीत असल्याचे व्यक्त केल. त्यांच्या चिंतेवर मी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळेच, मी स्पष्ट करू इच्छितो की मला काहीच झालेले नाही. मला कुठलाही आजार नाही."

बातम्या आणखी आहेत...