आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आसाम राज्यात विधानसभा निवडणुकीवरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाचा दौरा करत सभा घेतल्या. गृहमंत्री शहा यांनी राज्यातील धेमाजी जिल्हातील सभेत काँग्रेससहीत विरोधकांवर जोरदार टीका केली. ते बोलतांना म्हणाले की, भाजपप्रणीत सर्वानंद सोनेवालच्या सरकारने आसाममध्ये विकासाचे काम केले आहे. परंतु, काँग्रेसला येथे बदरुद्दीन अजमल सोबत निवडणूक लढवावी लागत आहे. जर राज्यात काँग्रेसच्या युतीची सरकार आले तर येथे घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतील, त्यामुळे काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे की, ते अजमल सोबत निवडणूक लढवत आहे.
शहा यांनी राहुल गांधीवर साधला निशाणा
अमित शहा यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटले की, मी राहुल गांधीला विचारु इच्छीतो की, एककडे तुम्ही आसामची प्रतिमा जपण्याची गोष्ट करता आणि दुसरीकडे अशा व्यक्ती सोबत निवडणूक लढवता जे घुसखोरीला प्रोत्साहन देतात. यामुळे आसामची प्रतिमा कशी जपणार असे ते बोलताना म्हणाले.
शहा यांच्या सभेतील चार महत्वाच्या गोष्टी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.