आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर आलेले अमित शाह या मेळाव्यासाठी मिदनापूरला दाखल झाले आहेत. मंचावर TMC सोडलेले आणि ममतांचे खास असलेले शुभेंदू अधिकारीही हजर होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शुभेंदू अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्ष आणि विधानसभेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती. खासदार सुनील मंडल आणि 9 आमदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी 5 आमदार तृणमूल कॉंग्रेसचे आहेत.यावर अमित शाह म्हणाले की, निवडणूक येईपर्यंत दीदी (ममता बॅनर्जी) एकट्याच राहतील शुभेंदु अधिकारेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.
अमित शाह यावेळी म्हणाले की, 'सर्व पक्षांमधील चांगले लोक आज भाजपमध्ये आले आहेत. एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपमध्ये आलेय. ही तर सुरुवात आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षामध्ये आलेले आहेत. यावर ममता दीदी म्हणतात, भाजप लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करुन देतो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?' असा सवाल अमित शाहांनी ममता बॅनर्जींना विचारला आहे.
आपल्या भाषणात अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. यासोबतच त्यांनी म्हटले की, या महान भूमिला मी प्रणाम करतो. जिथे शिक्षा शास्त्री ईश्वरचंद्र विद्यासागर आणि शहीद खुदीराम बोस यांचा जन्म झाला. गृहमंत्री म्हणाले की बंगालची माती कपाळावर लावण्याचे सौभाग्य मिळाले. स्वातंत्र्यलढ्यात बंगाल आणि बंगालींचे योगदान विसरता येणार नाही. खुदीराम बोस यांनी अवघ्या 18 व्या वर्षी देशासाठी जीवनदान दिले. त्यावेळी अनेक तरुण धोतीवर आपली नावे लिहित होते.
अमित शहा यांनी रामकृष्ण आश्रमात जाऊन मिशन बंगालची सुरुवात केली. येथे त्यांनी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटले. येथे ते म्हणाले की मी खुशीराम बोस यांच्या घरी येऊन नवीन उर्जा अनुभवत आहे.दरम्यान अमित शाह हे दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते बंगालमधील विधानसभा निवडणुकांबाबत पक्षाच्या रणनीतीची रूपरेषा आखतील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला कसलीही कसर सोडायची नाही. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर येथील निवडणूकीचा मोर्चा स्वत: अमित शहा सांभाळत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.