आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Mamata Banerjee West Bengal Update | BJP Parivartan Yatra Latest News | Home Minister Offers Prayers At Bharat Sevashram Sangha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे मिशन बंगाल:गृहमंत्री शहा यांनी भारत सेवाश्रम संघात केली पूजा, 22 फेब्रुवारीला प्रधानमंत्री मोदी करणार सभेला संबोधित

कोलकाता6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 फेब्रुवारीला प्रधानमंत्री मोदी करणार सभेला संबोधित

भारताचे गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बंगालात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले आहेत. पहिल्या दिवशी गुरुवारी त्यांनी कोलकतातील भारत सेवाश्रम संघात जाऊन पुजा करत कार्यक्रमाला सुरूवात केली. यानंतर ते गंगासागरातील कपिल मुनी आश्रमचा दौरा करणार आहेत. येथे नारायणपुरी गावांतील गरीब शरणार्थी कुटुबांसोबत जेवण करतील. तसेच, काकद्वीपात भाजपच्या पाचव्या परिवर्तन सभेला संबोधित करत हिरवा झेंडा दाखवतील.

7 दिवसांत दुसरा दौरा
अमित शहा यांचा हा 7 दिवसातील दुसरा दौरा आहे. यापुर्वी ते 11 फेब्रुवारीला ठाकुरनगरतील एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी सांगितले होते की, आम्ही नागरिकता संशोधन कायदा घेऊन आलो होतो. परंतू, मध्येच कोरोनाचे संकट आले. यावर टीका करतांना ममता दिदींनी सांगितले होते की, हे सर्व आश्वासन खोटे आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही जे सांगतो, तेच आम्ही करतो. देशात लसीकरण पूर्ण होताच, आणि कोरोनापासून मुक्तता मिळताच तुम्हा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करणार आहे.

भाजपमध्ये प्रवेश करु शकतात दिनेश त्रिवेदी

नुकताच राज्यसभा सदस्याचा राजीनामा देणारे दिनेश त्रिवेदी हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपत सामील होऊ शकतात. त्रिवेदी हे मागील दोन महिण्यांपासून पक्षाशी अंतर ठेवून राहत होते. दरम्यान बजेट सत्रादरम्यान राजीनाम्याची घोषणा करत त्यांनी सर्वांना चक्रावून टाकले होते. एकेकाळी त्रिवेदी हे ममता बॅनर्जीचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी मानले जात होते.

22 फेब्रुवारीला प्रधानमंत्री मोदी करणार सभेला संबोधित

पश्चिम बंगाल निवडणूकीच्या विजयासाठी भाजपाने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हुगळीतील एका सभेला संबोधित करतील. दरम्यान, मोदी हे मेट्रो प्रोजेक्टला देखील संबोधित करणार आहेत.