आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah, Nadda Will Hold 24 Public Meetings This Year; Also Touring 11 States This Month

लाेकसभेची तयारी:अमित शहा, नड्डा यंदा घेणार 24 जाहीर सभा; या महिन्यात 11 राज्यांचा दौराही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम आखला आहे. दोन्ही नेते वर्षभरात २४ जाहीर सभा घेतील. शहा १७ जानेवारीला मथुरापूर व आरामबागमध्ये येतील. त्याशिवाय “लाेकसभा प्रवास’ हे अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा ११ राज्यांचा दाैरा करणार आहेत. त्यांचा हा दाैरा ५ जानेवारीपासून त्रिपुरातून सुरू हाेईल. त्रिपुरानंतर ते ६ जानेवारीला मणिपूर व नागालँडला जातील. ७ जानेवारीला ते छत्तीसगड व झारखंडला भेट देतील. ते ८ राेजी आंध्र प्रदेशला जातील. १६ जानेवारीला ते उत्तर प्रदेश, १७ राेजी पश्चिम बंगाल, २८ राेजी ते हुबळी-कर्नाटकला जाणार आहेत. २९ जानेवारी-हरियाणा व पंजाब असा त्यांचा दाैऱ्याचा कार्यक्रम असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या लाेकसभेत पक्षाने गमावलेल्या १६० जागांची यादी पक्षाने तयार केली हाेती. परंतु आता २०२४ च्या लाेकसभेत पक्ष या जागांवर विजय मिळवेल, अशी पक्षाची बळकट स्थिती असल्याचे पक्षाला वाटते. कारण पक्षाला या राज्यांत चांगला जनाधार मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...