आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरात बोलण्यावर शहा यांचे संसदेत स्पष्टीकरण:गृहमंत्री म्हणाले -मला राग येत नाही, माझा मोठा आवाज 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट', लोकसभेत उडाला हास्यकल्लोळ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी धीरगंभीर व रागात दिसणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी संसदेत चांगल्याच हलक्याफुलक्या अंदाजात दिसून आले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपल्या जोरात बोलण्याचे कारण 'राग' नव्हे तर 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानावर संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

शहा यांनी यावेळी आपल्याला केवळ काश्मीरशी संबंधित प्रश्नांचा राग येत असल्याचे नमूद करत आपण कुणावर ओरडत किंवा राग करत नसल्याचेही स्पष्ट केले.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला प्रश्नाला देत होते उत्तर

अमित शहा लोकसभेच्या पटलावर क्रिमिनल प्रोसीजर (आयडेंटिफिकेशन) बिल-2022 सादर करत होते. 'या विधेयकामुळे गुन्ह्याचा प्रभावी व वेगवान तपास होऊन दोषसिद्धीचा वेग वाढेल,' असे ते म्हणाले.

यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या काही दाव्यांवर आक्षेप घेतले. त्यावर शहा यांनी आपण केवळ 'दादां'च्या प्रश्नांना उत्तर देत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे नेते संदिप बंडोपाध्याय यांनी अमित शहा 'दादा' म्हणतात तेव्हा ते रागात बोलत असल्याचे वाटते असे मत व्यक्त केले. त्यावर शहा यांनी आपले मोठ्याने बोलणे 'उत्पादन दोष' म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' असल्याचे स्पष्ट केले.

शाह सभागृहात जोरदार प्रत्युत्तर देतात

संसदेने ऑगस्ट 209 मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे विधेयक पारित केले होते. त्यावेळी अमित शहा व काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. त्यावर शहा यांनी आपली देशासाठी प्राण देण्याची तयारी असल्याचे ठणकावून सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...