आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवाद्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमधील महाआघाडीचे सरकार कोसळेल. त्यानंतर भाजपचे सरकार सत्तेत येईल. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही दंगलखोरांना उलटे टांगून सरळ करू. भाजप व्होट बँकेचे राजकारण करत नाही. आमच्या सरकारमध्ये दंगली होत नाहीत. यापुढे नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमीच बंद असतील.
अमित शहांनी रविवारी नवादाच्या हिसुआ येथील सम्राट अशोक जयंती कार्यक्रमात सुमारे 21 मिनिटे संबोधित केले. ते म्हणाले - माझी सासारामला जाण्याची इच्छा होती. तिथे सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार होता. पण दुर्दैवाने तिथे लोकांना मारले जात आहेत. गोळीबार केला जात आहे. त्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. येथून तेथील जनतेची माफी मागतो. पुढील दौऱ्यात मी सासाराममध्ये सभा घेईन. बिहारमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी अशी देवाला प्रार्थना करतो.
लालूजी, नितीश तुमच्या मुलाला मुख्यमंत्री करतील हे विसरा
नितीश यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. तर तेजस्वींचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. बिहारची जनता यांच्यामुळे हैरान झाली आहे. पण देशातील जनतेने मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे लालूजी, नितीश कुमार तुमच्या मुलाला मुख्यमंत्री करतील हे विसरा.
अमित शहा म्हणाले की, लालूंच्या मुलाने नितीश यांचा साप, पलटूराम व रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा दिली. त्यानंतरही नितीश बाबू पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्यासोबत गेले.
नितीश-ललन बाबूंसाठी दरवाजे बंद
अमित शहा म्हणाले- मी बिहारच्या जनतेला व ललन बाबूंना स्पष्टपणे सांगतो की, निवडणूक निकालानंतरही नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंदच राहतील. नेहमीसाठीच बंद असतील.
राज्यपालांना फोन केल्यामुळे ललनसिंह नाराज
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मी राज्यपालांना फोन केल्यामुले ललनसिंहांना वाईट वाटले. तुम्ही बिहारमध्ये का ढवळाढवळ करत आहात, असे ते म्हणतात. नितीशकुमार यांच्या सत्तेच्या भूकेमुळे तुम्हाला नाईलाजाने लालूंच्या मांडीवर बसावे लागले. आमची कोणतीही मजबुरी नाही. भाजप जनतेत जाईल. लोकांना सांगेल. महाआघाडी सरकारला मुळापासून उखडून फेकण्यात येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.