आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amit Shah On Rahul Gandhi China: The Home Minister Said When The Soldiers Are Facing China, Do Not Make Such Statements At That Time, We Are Ready For Discussion In Parliament

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शाहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर:देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत असताना पाकिस्तान आणि चीन आनंदी होतील असे वक्तव्य करु नयेत - गृहमंत्री अमित शाह 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित शाह म्हणाले - आम्ही संसदेत चीनच्या मुद्द्यावर 1962 पासून आतापर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत
  • लडाखमध्ये चीनसोबत गेल्या एक महिन्यापासून वाद सुरू आहे, काँग्रेस या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधत आहे

लडाखमध्ये भारत-चीन संघर्ष सुरू आहे. या वादावर आता गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला. गृहमंत्र्यांनी राहुल गांधींच्या सुरेंदर मोदी या ट्विटवर प्रत्युत्तर देत म्हटले की, 'संसद होणार आहे, चर्चा करायची असेल तर या. 1962 पासून आतापर्यंत सर्व विषयांवर चर्चा करु' तसेच ते म्हणाले की, चर्चा करायला आम्ही घाबरत नाही. देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत आहे, सरकार एक स्टँड घेऊन ठोस पाऊलं उचलत आहे. मात्र या काळात पाकिस्तान आणि चीनला आनंद होईल अशा प्रकारचे वक्तव्य कुणीही करायला नको.

कॉंग्रेस पक्ष भाजपवर लोकशाही संपुष्टात आणत असल्याचा आरोप करत आहे. यावर शाह म्हणाले की लोकशाही शब्दाचा अर्थ खूप विस्तृत आहे. शिस्त आणि स्वातंत्र्य ही त्याची मूल्ये आहेत. अडवाणी जी, राजनाथ जी, गडकरी जी आणि नंतर राजनाथ जी नंतर मी पक्षाध्यक्ष झालो. आता नड्डा जी अध्यक्ष आहेत. ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत काय? इंदिराजी नंतर गांधी घराण्याबाहेरुन आलेल्या एका तरी कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव सांगा? ते लोक लोकशाहीबद्दल काय बोलतील?

बातम्या आणखी आहेत...