आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने तुम्हाला अंधार दिला, पण आम्ही अधिकार दिला:अमित शहा म्हणाले - BJPने ईशान्येत 9,000 हून अधिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ​​​​​​​

भाजपने त्रिपुरामध्ये राजवट संपवली आणि संविधानाचे नियम लागू केले. राज्यातील भीतीचे वातावरण संपवले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी म्हटले. तर कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत राज्यात 4 हजार लोक मारले गेले. आता त्रिपुरा विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. काँग्रेसने तुम्हाला अंधार दिला, आम्ही तुम्हाला अधिकार दिला, असे म्हणत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपने ईशान्येत 9,000 हून अधिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडल्याचे ते म्हणाले.

आगरतळा येथील विजय संकल्प रॅलीत गृहमंत्री बोलत होते. काँग्रेस, कम्युनिस्ट आणि टिपरा मोथा हे सगळे एकत्र असल्याचे ते म्हणाले. पहिले दोघे जाहीरपणे युती करत असले तरी मोथा त्यांच्यासोबत 'अंडर द टेबल' युतीत आहेत. टिपरा मोथाला कम्युनिस्ट राजवट परत आणायची आहे. तुमचे मत मोथा किंवा काँग्रेसला गेले तर हे मत कम्युनिस्टांना जाईल. विकास आणि शांतता हवी असेल तर कमळाचे बटण दाबा, असे आवाहन त्यांनी केले.

आमच्या सरकारने केडर राजवट संपवली
रेशनकार्ड असो वा स्वस्त धान्य असो, प्रत्येक छोट्या-छोट्या कामासाठी पूर्वी लोकांना कम्युनिस्ट पक्षाच्या केडरकडे जावे लागत असे. पण आमच्या सरकारने केडरची राजवट रद्द करून संविधान आणले. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने त्रिपुरावर 50 वर्षे राज्य केले पण राज्यात विकास घडवून आणला नाही. हायवे, इंटरनेट, रेल्वे, विमानतळ या पंतप्रधान मोदींनी दिलेल्या HIRA (हिरा) घोषणेखाली राज्य प्रगती करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, जोपर्यंत ईशान्येचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, जोपर्यंत ईशान्येचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही.

भाजपच्या राजवटीत आदिवासी हक्क उपभोगत आहेत
गृहमंत्री म्हणाले की, त्रिपुरा एकेकाळी ड्रग्ज, मानवी तस्करी, बांगलादेशी घुसखोरी, भ्रष्टाचार आणि आदिवासींवरील अत्याचारांसाठी ओळखला जात होता. परंतु भाजपच्या राजवटीत रस्ते बांधले जात आहेत. लोकांना पिण्याचे पाणी मिळत आहे, सेंद्रिय शेती केली जात आहे आणि विशेषत: आदिवासी त्यांचे हक्क उपभोगत आहेत.

भाजप पाच वर्षात त्रिपुराला सर्वोत्तम राज्य बनवेल
ते म्हणाले की, माकपच्या राजवटीत त्रिपुरामध्ये लोक मारले गेले आणि संपूर्ण राज्यात हिंसाचार झाला. भाजपने ब्रु-रियांग करार करून येथे विकास घडवून आणला. या पाच वर्षांत भाजपने येथे शांतता प्रस्थापित केली असून पुढील पाच वर्षांत आमचा पक्ष त्रिपुराला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य बनविण्याच्या दिशेने काम करेल.

गृहमंत्र्यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत भाजप त्रिपुराला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य बनवण्याच्या दिशेने काम करेल.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत भाजप त्रिपुराला ईशान्येतील सर्वोत्तम राज्य बनवण्याच्या दिशेने काम करेल.

मुख्यमंत्री म्हणाले - ईशान्येचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. जोपर्यंत ईशान्येचा विकास होत नाही. तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. डाव्या सरकारच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत एकट्या दक्षिण जिल्ह्यात 69 जणांचा बळी गेला. आज ते पुन्हा सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत.

17 फेब्रुवारीला होणारी निवडणूक, भाजपकडे 55 उमेदवार
ईशान्येकडील राज्यातील विधानसभेच्या 60 जागांसाठी 17 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. गृहमंत्री अमित शाह हे देखील सध्या त्रिपुरामध्ये आहेत. भाजपने मात्र 55 उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीचा निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...