आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पीएफआयच्या अजेंड्यावर चालत असल्याची टीका अमित शहा यांनी कर्नाटकातील सवदत्ती येल्लम्मामध्ये आयोजित भाजपच्या प्रचारसभेदरम्यान केली. काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करते अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने नेहमी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांवर अन्याय केला. जेव्हाही राज्यात काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा यांनी शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या. मात्र आमचे डबल इंजिन सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 रुपये टाकत आहे असे शहा म्हणाले.
सवदत्ती येल्लम्मानंतर शहा अथणीला गेला. तिथे एका सभेला त्यांनी संबोधित केले. यानंतर त्यांनी रायबागमध्ये रोड शो केला. तर त्यानंतर चिकोडी सादलगा आणि यमकनमर्डीमध्ये सभेला संबोधित केले.
काँग्रेसने श्रीरामांना कुलुपात ठेवले, बजरंगबलीचा अपमान केला
अमित शहांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसच्या जाहिरनाम्याचा उल्लेख करताना म्हटले की, काँग्रेसने श्रीरामांना कुलुपात ठेवले. आता बजरंगबलीचा अपमान केला. जनता हे सर्व बघत आहे. इतकेच नाही, यांनी वारंवार सावरकरांचाही अपमान केला. त्यांनी शिवाजी महाराजांचा विसर पाडण्याचा प्रयत्न केला काँग्रेसला इतिहास माहिती नाही.
यावेळी राहुल गांधींवरही त्यांनी टीका केली. राहुल गांधी 10 जन्म जिवंत राहिले तरी सावरकरांच्या बलिदानाच्या 10 व्या भागाची बरोबरी ते करू शकणार नाही असे शहा म्हणाले. काँग्रेस कधीही कल्याण आणि विकासाविषयी विचार करत नाही. काँग्रेस केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करते. केवळ मोदीजीच लोकांचे जीवन बदलवू शकतात. त्यांच्या नेतृत्वात कर्नाटकाचा विकास शक्य आहे असे शहा म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.