आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah's Mission West Bengal : Amit Shah's Road Show In Bolpur, Says Crowds Show That Bengal Needs Change Now

अमित शाहांचे मिशन बंगाल:अमित शाह यांचा तृणमूलचा बालेकिल्ला बोलपुरमध्ये रोड शो, म्हणाले - गर्दी दाखवते की आता बंगालला आता परिवर्तनाची गरज आहे

कोलकाता7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहे, त्यामुळे शाहांचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो

गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज तृणमूलचा बालेकिल्ला बोलपूरमध्ये रोड शो केला. बोलपूरमध्ये ममता यांच्या आधी 43 वर्षांपर्यंत कम्युनिस्टांचा ताबा राहिला आहे. या रोड शो दरम्यान शाह म्हणाले की, तुम्ही कम्युनिस्टांना संधी दिली, ममता यांना संधी दिली, एकदा आम्हा संधी द्या आणि आम्ही 5 वर्षांत सोनार बांगला बनवू. शाह म्हणाले की, 'असा रोड शो मी कधीच पाहिला नाही. बंगालची जनतेला आता बदल हवा आहे ते या गर्दीतून दिसत आहे.' शाह यांच्या बंगाल दौरा आज पूर्ण होणार आहे आणि संध्याकाळी ते दिल्लीकडे होतील.

शहा यांनी बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा निवडणुकीचा मुद्दा बनविला

अमित शाह यांनी बंगाल निवडणुकीसाठी बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा प्रचारासाठी मुद्दा बनवला आहे. रोड शो मध्ये अमित शाह म्हणाले की, ''हा बदल बंगालच्या विकासासाठी होणार आहे. हा बदल बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आहे. हा बदल राजकीय हिंसाचार संपवण्यासाठी आहे. हा बदल टोलेबाजी संपवण्यासाठी आहे.'

बोलपुर हे भाजपासाठी महत्वाचे

भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी बोलपूर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा मतदारसंघ एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला होता. 1971 ते 2014 पर्यंत येथे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य होते. त्यापैकी चार वेळा सरादीश रॉय आणि सात वेळा ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी निवडणूक जिंकले आहेत. 2014 मध्ये या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यावर तृणमूल काँग्रेसने आपला झेंडा फडकवला. तृणमूलला या जागेवर दोनदा ताबा मिळाला आहे.

दौऱ्याचा पहिला दिवस धमाकेदार राहिला

शाह यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात धमाकेदारपणे केली. मिदनापूर येथे झालेल्या सभेत तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार, एक खासदार, माजी खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे सहायक शुभेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चांगले लोक भाजपची साथ देत असल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले होते.

शाह यांनी रामकृष्ण आश्रमापासून केली मिशन बंगालची सुरुवात

अमित शाह यांनी रामकृष्ण आश्रमापासून मिशन बंगालची सुरुवात केली. येथे त्यांनी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर स्वातंत्र्य सैनिक खुदीराम बोस यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

पुढील वर्षी बंगालमध्ये निवडणूक

सध्या केंद्र आणि ममता सरकारमधील संबंध चांगले नाहीत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ला, भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ले यामुळे ही कटूता वाढत चालली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो.

बातम्या आणखी आहेत...