आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Injury Update; Project K Movie Shooting | Prabhas | Deepika Padukone | Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान जखमी:हैदराबादेत 'प्रोजेक्ट K' ची सुरू होती शूटिंग, बरगड्यांना इजा; म्हणाले - श्वास घेण्यासही त्रास होतोय

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन हैदराबाद येथे शूटिंगदरम्यान जखमी झालेत. त्यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे. ते सध्या मुंबईतील आपल्या घरी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन हे प्रभासच्या 'प्रोजेक्ट K' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले - बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.

अमिताभचा हा फोटो प्रोजेक्ट K चा आहे. डावीकडून -प्रभास, प्रशांत नील (डायरेक्टर), राघवेंद्र राव (प्रोड्यूसर-डायरेक्टर, नानी (अभिनेता), दुलकर सलमान, नागी अश्वीन.
अमिताभचा हा फोटो प्रोजेक्ट K चा आहे. डावीकडून -प्रभास, प्रशांत नील (डायरेक्टर), राघवेंद्र राव (प्रोड्यूसर-डायरेक्टर, नानी (अभिनेता), दुलकर सलमान, नागी अश्वीन.

अमिताभ म्हणाले - जलसावर चाहत्यांना भेटू शकणार नाही

बिग बी म्हणाले -"मी बरा होईपर्यंत सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. मी जलसात विश्रांती घेत आहे. फक्त आवश्यक गोष्टींसाठी थोडेसे चालावे लागणार. होय, आराम तर सुरूच राहणार. मी जलसाच्या गेटवर माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, हे सांगणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. जलसावर येण्याचा विचार करणाऱ्यांना सध्या त्यांना याची माहिती द्या. बाकी सर्वकाही ठीक आहे."

पायाची नस कापल्यामुळे बिग बींना पडले होते टाके

अमिताभ बच्चन यांनी दिवाळीपूर्वी त्यांच्या पायाची नस कापली गेल्याची माहिती दिली होती. तेव्हा ते आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले होते - पायाची नस कापल्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला. मला रुग्णालयातही जावे लागले. तिथे डॉक्टरांनी पायाला टाके घातले.

ते पुढे म्हणाले की, लोखंडाचा एक तुकडा माझ्या उजव्या पायाला लागला. त्यामुळे नस कापली गेली. नस कापताच खूप रक्तस्त्राव झाला. सहकारी अभिनेत्यांनी व डॉक्टर्सनी वेळेवर उपचार केल्यामुळे मी लवकर बरा झालो. ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन माझ्या पायाला काही टाकेही घालण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...