आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ammonia Leak In Aligarh Meat Factory, 59 Workers Unconscious, Collector Said All In Stable Condition

अलीगडच्या मांस कारखान्यात अमोनियाची गळती:59 कामगार बेशुद्ध, परिसरात पोलीस-प्रशासन तैनात; जिल्हाधिकारी म्हणाले- सर्वांची प्रकृती स्थिर

अलीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगडमधील मांस कारखान्यात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. येथील प्लांटमधून अमोनिया गॅसची गळती झाली. या दुर्घटनेत 59 जण बेशुद्ध झाले. सुरुवातीला एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह म्हणाले, "सर्व 59 जणांची प्रकृती स्थिर आहे. मृत्यूची नोंद नाही. अफवांकडे दुर्लक्ष करा. आम्ही वैद्यकीय पथकाच्या सतत संपर्कात आहोत. सर्वांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत."

59 जण बेशुद्ध, सर्वांची प्रकृती स्थिर

रोरावार येथील अल्दुआ मीट फॅक्टरीत गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सकाळी कामगार कारखान्यात काम करत होते. त्यात बहुतांश महिला होत्या. अचानक प्लांटमधून अमोनिया गॅसची गळती सुरू झाली. यानंतर कारखान्यात पळापळ सुरू झाली. कोणालाच काही समजत नव्हते. एकामागून एक महिला कामगार बेशुद्ध पडत होत्या.

आजूबाजूच्या गावातील लोकांनी आजारी व्यक्तींना वाहनांमध्ये भरून वैद्यकीय महाविद्यालय गाठले.
आजूबाजूच्या गावातील लोकांनी आजारी व्यक्तींना वाहनांमध्ये भरून वैद्यकीय महाविद्यालय गाठले.

जिल्हाधिकारी म्हणाले- प्रकरणाची चौकशी केली जाईल

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह आणि एसएसपी कलानिधी नैथनी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. येथे त्यांनी जखमींकडून घटनेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी इंदर विक्रम सिंह यांनी सांगितले की, मांस कारखान्यात पॅकेजिंगचे काम केले जाते. बहुतांश कर्मचारी महिला आहेत. अमोनिया गॅसच्या गळतीमुळे ही दुर्घटना झाली. सर्वांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

कामगारांना उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कामगारांना उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...