आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Among The Five Major Religious Places Of Gujarat, Only 'Dwarka' Is Favored By The BJP

गुजरात निवडणूक:गुजरातच्या प्रमुख पाच धर्मस्थळांपैकी फक्त ‘द्वारके’चीच भाजपवर कृपा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातची एक कथा मनोरंजक आहे. गेल्या काही वर्षांत येथे अनेक धर्मस्थळी भाजप सरकारच्या काळात मोठी विकास कामे झाली. तरीही धर्मध्वजा हाती घेत देशभरात डंका पिटणारा भाजप गुजरातच्या प्रमुख धर्मस्थळी पराभूत होत आला आहे. ती आहेत-अंबाजी, सोमनाथ, चोटिला आणि डाकोरजी. द्वारका या जागेचा अपवाद, तेथे भाजप विजयी झालेला आहे.

सोन्याचे शिखर असलेले अंबाजी मंदिर दांता (राखीव) विधानसभा मतदारसंघात येते. गेल्या पाच निवडणुकांपासून भाजप सतत पराभूत होत आहे. इथे असा समज आहे की अंबाजीपासून प्रचार सुरू केला तर भाजपचे सरकार येते. भाजप तसा प्रचार सुरू करतोही, पण दांतामध्ये पक्षाचा पराभव होतो. येथे सुमारे अडीच लाख मतदारांपैकी ५० टक्के मतदार आदिवासी आहेत. ते काँग्रेसलाच मते देतात. दुसरे धर्मस्थळ आहे सोमनाथ. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. मंदिराचा संपूर्ण विकास भाजप सरकारमध्ये झाला. गेल्या पाच निवडणुकांपैकी भाजपला फक्त २००७ मध्ये विजय मिळाला, तर चारदा पराभव. येथे कोळी समाज आणि मुस्लिम मतदार काँग्रेसला पसंती देत आले आहेत. चोटिलात चामुंडामातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे फक्त २०१२ मध्ये भाजप जिंकला. दोनदा अपक्ष आणि दोनदा काँग्रेसला विजय मिळाला. या जागेवर ३५ टक्के कोळी मतदार आहेत. तेच विजय-पराभवाचा निर्णय करतात.

डाकोरजी. असे म्हणतात-डाकोरचा ठाकोर कोण? रणछोड रायजी. येथे भगवान रणछोड रायजींचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते ठासरा मतदारसंघात येते. २०१२ मध्ये भाजप जिंकू शकला. ठासरा जागा इतर चार वेळा काँग्रेसच्या खात्यात गेली. तेथे माजी मुख्यमंत्री माधवसिंह यांची KHAM (खाम) थेअरी आजही चालते. KHAM म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम. या संकल्पनेतून माधवसिंह यांनी या सर्व जातींना एकत्र केले होते. पाटीदार, दलित आणि क्षत्रियांची मते असलेल्या या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. द्वारकाधीशांची भाजपवर निश्चित कृपा आहे. तेथे भाजपचे पबुभा जिंकत आले आहेत. तथापि, हा विजय खऱ्या अर्थाने कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर तो पबुभांचा असतो. ते काँग्रेसच्या तिकिटावरही जिंकले. अपक्षही आणि आता भाजपच्या तिकिटावरही सतत जिंकले.

बातम्या आणखी आहेत...