आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Among Thousands Of Workers, I Am Also A Volunteer; Statement By Prime Minister Narendra Modi

प्रमुखस्वामी शताब्दी महोत्सव सुरू:हजारो कार्यकर्त्यांमध्ये मीही स्वयंसेवक ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

अहमदाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी व महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अहमदाबादेत प्रमुखस्वामी महाराज शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. एक महिना चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील भाविक सहभागी झाले. पंतप्रधान मोदींनी आपल्या मनोगतामध्ये प्रमुखस्वामी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. प्रमुखस्वामी महाराज पितृतुल्य आहेत. भारताचे रंग येथे दिसतात. हा भव्य कार्यक्रम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. येथील हजारो कार्यकर्त्यांमध्ये मीदेखील एक स्वयंसेवक अाहे. येथे वसुधैव कुटंुबकमची भावना दिसली, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह बीएपीएसचे अनेक संत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...