आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील होत्या. यावेळी त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पाहणीनंतरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या वादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले. असे असूनही 80 लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही याबद्दल वाईट वाटते. संकटाच्या या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. कृषी, वीज क्षेत्र आणि व्यापाराचेही नुकसान झाले. लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. आता त्यांना मदत करणे हे आमचे काम आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य तेवढी मदत करतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'ममताजींच्या नेतृत्वात भारत सरकारने एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला आहे.आजचा दिवस हा देशासाठी अभिमानाचा आहे. राजा राम मोहन रॉय यांची जयंती आहे. या दरम्यान बंगालमध्ये असणे ही माझ्या मनाला भिडणारी गोष्ट आहे. संकटाच्या या घडीत मी एवढेच म्हणेन की राजा राम मोहन रॉय यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत जेणेकरून आपण एकत्र काम करू. मी बंगाल सरकारला आश्वासन देतो की संकटाच्या वेळी संपूर्ण देश आपल्याबरोबर आहे. मी या क्षणी सर्वांना भेटायला आलो आहे, परंतु कोरोनामुळे मी सर्व नागरिकांना भेटू शकत नाही. मी येथून ओडिशाला जात आहे. संकटांच्या या घटनेत मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आहे. लवकरात लवकर हे संकट संपने यासाठी मी काम करेन. बंगालसाठी त्वरित एक हजार कोटी रुपयांची मदत दिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 83 दिवसांनंतर दिल्लीतून बाहेर पडले. याआधी ते 29 फेब्रुवारी रोजी प्रयागराज आणि चित्रकूटच्या दौऱ्यावर गेले होते.
#WATCH: PM Narendra Modi conducts aerial survey of areas affected by #CycloneAmphan in West Bengal. CM Mamata Banerjee is also accompanying. pic.twitter.com/Da7NebJhws
— ANI (@ANI) May 22, 2020
या शतकातील सर्वात शक्तिशाली अंफन चक्रीवादळ बंगालमध्ये प्रचंड नुकसान करून बांगलादेशच्या दिशेने वळले आहे. यामुळे आसाम, मेघालयात शुक्रवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यातील मृतांची संख्या 80 वर पोहचली आहे.
7 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते
एनडीआरएफने दोन्ही राज्यांतील 7 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. बंगालमध्ये 5 लाख लोकांना किनारपट्टी भागातून हलवण्यात आले. येथे कोलकाता, हावडा, हुगळीसह सहा जिल्ह्यांत वादळामुळे प्रचंड नुकसान. घरांसह विजेचे खांब, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले.
283 वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळ
अंफान बंगालमध्ये 283 वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळ होते. 1737 मध्ये ग्रेट बंगाल चक्रीवादळामुळे तीन लाख लोकांचा बळी गेला होता. दुसरीकडे ओडिशात 1999 मध्ये सुपर सायक्लोन आले होते, यामध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.