आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची अमरावतीतच तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी हत्या केली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, NIAने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही बाब समोर आली आहे. ही हल्ला सामान्य समजणे चुकीचे ठरेल, यातून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा सुनियोजित कट होता, असे सांगण्यात येत आहे.
अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आरोपपत्रात दावा केला आहे. यात तबलिगी जमातच्या 11 आरोपींचा समावेश होता. तबलिगी जमात ही एक आंतरराष्ट्रीय देवबंदी इस्लामिक मिशनरी चळवळ आहे. जी इस्लामिक श्रद्धांचे काटेकोर पालन करण्यावर आग्रही आहे.
आधी संपूर्ण प्रकरण वाचा...
अमरावती येथील उमेश कोल्हे ( वय- 54) यांची 21 जून रोजी कामावरून परतत असताना तीन हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली होती. हत्या होण्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकली होती. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांना कोल्हे यांचा शिरच्छेद करायचा होता, मात्र मागून येणाऱ्या मुलगा व सुनेच्या आरडाओरडाने ते पळून गेले.
काय म्हटले आहे आरोपपत्रात?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली हत्येची संपूर्ण कहाणी
21 जून रोजी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. रात्री 10.30 वाजता प्रभात चौकात असलेल्या महिला महाविद्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात या हत्येची घटना कैद झाली. यामध्ये दोन आरोपी उमेश कोल्हेच्या मागे लागलेले दिसले. त्यानंतर घटनेनंतर ते पळून जातानाही दिसले.
मित्राला व्यवसायाचा हेवा, त्याचाही या हत्येत समावेश
मारेकरांना चितावणी देण्यात कोल्हेचा मित्र डॉ. युसूफचा देखील हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. युसूफ हाही या खून प्रकरणात आरोपी आहे. कोल्हे यांच्या व्यवसायाचा त्याला हेवा वाटत होता. त्यामुळे त्याने कट रचला आणि कोल्हेंच्या फेसवूक पोस्टला माध्यम बनवून त्याची हत्या करायला लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.