आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amrit Mahotsav Of Hyderabad Liberation War Will Be Celebrated Throughout The Year; Launched On September 17 | Marathi News

माेदी सरकारची घाेषणा:हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव वर्षभर साजरा होणार; 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद मुक्तिसंग्रामाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे वर्षभर अमृतमहोत्सव साजरा करण्याची घोषणा माेदी सरकारने केली आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी या उत्सवाची सुरुवात होणार असून गृहमंत्री अमित शहा शुभारंभप्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांनी शनिवारी दिली.

उद्घाटन समारंभ हैदराबाद येथील परेड मैदानावर होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्र, तेलंगण आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२३ असा वर्षभर हा महोत्सव साजरा करण्यात येईल. १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत पोलिस कारवाई करून मराठवाडा, हैदराबादसह तेलंगण आणि कर्नाटकातील काही जिल्हे निझामाच्या जोखडातून मुक्त झाले होते. दरम्यान, मुक्तिसंग्रामऐवजी हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून साजरा करावा, अशी मागणी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...