आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amritsar Attempt Of Infiltration Border; Bsf Killed Pakistani Intruder | Punjab | Amritsar News

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा:सीमा ओलांडून अमृतसरमध्ये काटेरी तारांजवळ पोहोचला, सोबत आणली होती बंदूक

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील अमृतसर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. घुसखोराकडे इंपोर्टेड बंदूकही होती. या वर्षातील हा पहिलाच घुसखोरीचा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यात बीएसएफला यश आले आहे. सध्या बीएसएफने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर सेक्टर अंतर्गत बीओपी चन्नामध्ये हा घुसखोर आला होता. बीएसएफच्या 73 बटालियनचे जवान सीमेवर गस्तीवर होते. इतक्यात दाट धुक्यात त्यांना कोणीतरी आल्याचा भास झाला. घुसखोर भारतीय सीमेच्या 500 मीटर आत बांधलेल्या सुरक्षा कुंपणापर्यंत पोहोचला होता. बीएसएफ जवानांनी आवाज देताच घुसखोराने लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांना गोळीबार करावा लागला.

घुसखोराने पंप गन सोबत आणली होती
बीएसएफ जवानांनी मारल्या गेलेल्या घुसखोराकडून एक पंप गनही जप्त केली आहे. घुसखोराने बीएसएफ जवानांवर गोळीबार केला की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही. तस्करीच्या उद्देशाने तो भारतीय हद्दीत घुसला असावा, असा अंदाज आहे.

2022 मध्ये 2 घुसखोर मारले गेले
गेल्या वर्षी २०२२ बद्दल बोलायचे झाले तर, संपूर्ण वर्षभरात बीएसएफने २ घुसखोरांना ठार केले होते, तर २२ जणांना भारतीय सीमा ओलांडताना पकडले होते. एवढेच नाही तर चुकून सीमा ओलांडून भारतीय हद्दीत पोहोचलेल्या 9 पाकिस्तानी नागरिकांना 24 ते 48 तासांत पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...