आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amul Franchise Business Opportunity | Marathi News |Amul Parlour Open Amul Franchise With An Investment Of Rs 2 Lakh

फ्रँचायझीमधून कमाई:2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने अमूलची फ्रँचायझी उघडा, कमवू शकतात लाखो रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमूल हा देशातील आघाडीचा ब्रँड आहे. त्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे व्यवसाय मॉडेल त्याच्या क्षेत्रातील सर्वोत्तम मानले जाते. ज्यांना अमूलमध्ये सामील होऊन त्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना अमूल फ्रँचायझी ऑफर करते. यामध्ये लाखो रुपयांची कमाई होऊ शकते, परंतु किती कमाई होणार हे उत्पादनाच्या विक्रीवर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही अमूलसोबत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही येथे अमूल फ्रँचायझी घेण्याची प्रक्रिया सांगत आहोत.

पहिले अमूल पार्लर समजून घ्या
अमूल पार्लर ही अमूलची खास आउटलेट्स आहेत, जिथे त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध असते. हे 100 चौरस फुटांपेक्षा मोठ्या जागेत असतात. आउटलेटच्या स्वरूपानुसार, त्याचे अंतर्गत आणि इतर उपकरणे स्थापित करण्यासाठी 2 लाख ते 6.0 लाख रुपये खर्च येऊ शकतो. अमूलचे होलसेल व्यापारी पार्लरला स्टॉक पुरवतात आणि फ्रँचायझीला उत्पादन विकल्यावर रिटेल मार्जिन मिळते.

रिटेल मार्जिन उत्पादनानुसार बदलते. संपूर्ण रिटेल मार्जिन पार्लर मालकाच्या खिशात जाते, कारण त्याला अमूलला कोणतीही रॉयल्टी किंवा महसूल भरावा लागत नाही. पार्लरच्या लोकेशन आधारे, महिन्याची विक्री उलाढाल 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

अमूल दोन प्रकारचे पार्लर ऑफर करते
अमूल दोन प्रकारचे पार्लर ऑफर करते. पहिले अमूल प्रिफर्ड आउटलेट आणि दुसरे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर.

1. अमूल प्रिफर्ड आउटलेट
अमूल प्रीफर्ड आउटलेटसाठी तुमच्याकडे 100-150 स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. एक आउटलेट उघडण्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च येतो. 2 लाख रुपयांपैकी 25,000 रुपये ब्रँड सुरक्षेसाठी जातात. नूतनीकरणासाठी सुमारे 1 लाख रुपये आणि उपकरणांची किंमत सुमारे 70,000 रुपये आहे.

किती कमाई होईल
कमाईबद्दल बोलायचे तर पाउच मिल्कवर 2.5% रिटर्न आहे. दुग्धजन्य पदार्थांवर 10% आणि आइस्क्रीमवर 20% मार्जिन आहे. विक्रीचे लक्ष्य साध्य केल्यावर, कंपनीकडून स्पेशन इन्सेन्टिव्ह लाभ मिळतो. म्हणजेच तुमची विक्री चांगली असेल तर लाखो रुपये मिळू शकतात.

2. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर
अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी करण्यासाठी तुमच्याकडे 300 चौरस फुटांपेक्षा जास्त जागा असावी. स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी उघडण्यासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च येतो. डिपॉझिटसाठी 50,000 रुपये जमा करावे लागतात. नूतनीकरणासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च होतात. उपकरणासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च लातो. इक्विपमेंट सपोर्ट पर्चेस अमाऊंटचा फायदा घेण्यासाठी सर्व व्हीसीकुलर आणि डीप फ्रीझर्स हे उपकरण अमूल ब्रँडेड असावेत.

कमाई किती होईल
रेसिपी आधारित आइस्क्रीम स्कूप्स / फ्लोट्स / शेक्स / बेक्ड पिझ्झा / सँडविच / चीज स्लाइस बर्गर / गार्लिक ब्रेड / हॉट चॉकलेट ड्रिंक (अमूल प्रो)वर सुमारे 50% मार्जिन मिळते. प्री-पॅकेज केलेल्या आइस्क्रीमचे मार्जिन सुमारे 20% आहे. इतर उत्पादनांवर मार्जिन 10% आहे. विक्रीचे टार्गेट पूर्ण केल्यावर, स्पेशल इन्सेन्टिव्हचा फायदा वेगळा होतो. चांगल्या विक्रीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

फ्रँचायझी कशी मिळेल?
अमूल प्रीफर्ड आउटलेट किंवा आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर उघडण्यासाठी, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 022-68526666 वर कॉल करा. फ्रेंचायझी चौकशीसाठी, retail@amul.coop वर मेल देखील करू शकता. जागा आणि इतर गोष्टी निश्चित झाल्यानंतर, तुम्हाला GCMMF Ltd. च्या नावाने चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे सुरक्षा ठेव जमा करावी लागेल. डिपॉझिट आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे घेतले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...