आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देवभूमीवर अस्मानी संकट:विजेने कोसळली 80 फूट लांबीची भिंत, मंदिर सुरक्षित

हरिद्वार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिद्वार येथील हर की पौडी गावावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली. सुदैवाने मंदिर सुरक्षित आहे. ही घटना ब्रह्मकुंडजवळ मध्यरात्रीनंतर अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. कोरोना संसर्गामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे हर की पौडी या धार्मिक स्थळी सध्या लोकांचा वावर नाही. यामुळे जीवितहानी झाली नाही. सोमवारी सोमवती अमावास्या होती. यानिमित्ताने गेल्यावर्षीपर्यंत येथे लाखो भक्त येत होते. परंतु कोरोनामुळे भाविकांची गर्दी टाळण्यासाठी हर की पौडी सील करण्यात आली होती. घटनेनंतर एसएसपींनी तेथे भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलिस व प्रशासनाने बॅरिकेड्स लावून ढीग हटवण्याचे काम सुरू केेले. या भिंतीवरून आखाडा परिषद व संतांमध्ये नाराजी आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितले, २०२१ मध्ये कुंभमेळा होणार आहे. सरकारला हर की पौडीची दुरुस्ती करावी लागणार आहे