आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुबईहून परतलेल्या शिवपुरी भागातील पेट्रोलियम इंजिनियर दीपक शर्मा यांना कोरोना झाला होता. उपचारानंतर ते बरे झाले आणि ४ एप्रिल रोजी घरी परतले. परंतु दीपक यांनी ‘घर विकणे आहे,’ असा बोर्ड लावला. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या दिवशी मी बरा होऊन घरी येत होतो, तेव्हा लाेक माझ्याकडे एखाद्या अपराध्याकडे पाहावेत तसे पाहात होते. मला वाटले काही दिवसांनंतर परिस्थिती बदलेल. पण हे शेजारी माझ्याशी सर्व कुटुंबीयांशी आणखी वाईट वागत आहेत. आम्ही सर्वजण खूप निराश झालो आहोत. कोरोना कोणालाही होऊ शकतो. पण लोकांनी अशी वागणूक देऊ नये. त्याची हिंमत वाढवायला हवी. परंतु शेजारी वाळीत टाकल्यासारखे वागत आहेत, असे शर्मा म्हणाले.
घरातील इतर लोकांना पाहून घराचे दरवाजे बंद करून घेतात
दीपक सांगतात, आता डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटते. जे परिचित आमच्या घरी येत जात होते, तेच आम्हाला पाहून घराचे दरवाजे बंद करून घेतात. आता कॉलनीतील इतर लोकही त्रास देत आहेत. आपण जेथे राहतो, तेथील लोक आपले वाटतात. परंतु , आता त्यांचे वर्तन पाहून खूप वाईट वाटते. आमच्यासोबत अशीच वागणूक मिळते आहे.
शेजाऱ्यांनी दूधवाल्यास म्हटले, त्यांच्या भांड्याला स्पर्श करू नकोस
दीपक यांचा एक शेजारी कोचिंग क्लास चालवतो. त्याने दूधवाला, भाजीवाल्यास आमच्या घरी जाण्यास मनाई केली आहे. दूधवाल्यास सांगितले, त्यांच्या भांड्याला स्पर्शही करू नकोस, विषाणूचा संसर्ग होईल. त्यांना दूधही देऊ नकोस. माझी आई ज्या रस्त्यावरून जाते, तिला तेथून जाण्यास मनाई केली जाते. हे सर्व एेकून आम्हालाच घृणा वाटते आहे.
वडिलांनी सांगितले, आम्ही घर सोडावे म्हणून शेजारी रात्री दरवाजे वाजवतात
दीपकचे वडील निवृत्त फौजदार आहेत. ते सांगतात, शेजारी रात्री दरवाजे ठोठावतात. आम्ही घर सोडून जावे म्हणून त्रास देतात. दीपक म्हणाले, मी आता येथे आहे. परंतु सगळी परिस्थिती चांगली झाली तर दुबईला परत जाईन. आई-वडिल एकटे येथे कसे राहतील? आम्ही घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्वाल्हेरला जाणार आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.