आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • An Initiative To Increase The Proceedings In Parliament, A Bill Will Be Introduced In The Lok Sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा:संसदेत कार्यवाही वाढवण्यासाठी पुढाकार, वर्षात निदान 100 दिवस सभागृह चालावे म्हणून लोकसभेत येणार विधेयक

नवी दिल्ली / मुकेश कौशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार अधिवेशने असावीत, अडथळ्यांचे तास अधिवेशनात जोडावेत

काेरोनामुळे संसदेचे अधिवेशन ठरलेल्या वेळेआधी स्थगित करण्यावर एकमत झाले असले तरी भाजप खासदार संसदेला १०० दिवस चालवण्याच्या बाजूने आहेत. यासाठी एक विधेयक तयार आहे. लोकसभेत सादर करण्यासाठी त्याला संसदीय समितीची मंजुरी मिळाली आहे.

घटनेत एक नवे कलम ८५ए जाेडण्याचा विधेयकात प्रस्ताव आहे. म्हणजे दोन्ही सभागृहे वर्षात कमीत कमी १०० दिवस चालतील. यात असाही प्रस्ताव आहे की, चार अधिवेशने असावीत आणि गोंधळ झाल्याने वाया गेलेला वेळ अधिवेशनाच्या कालावधीत जोडण्यात यावा. ११ वर्षांपूर्वीही असाच प्रस्ताव आला होता. संसदेच्या किमान १०० बैठका निश्चित करण्यासाठी असेच खासगी विधेयक समाजवादी पक्षाच्या खासदाराने ११ वर्षांपूर्वी म्हणजे २००९ मध्ये सादर केले होते. त्या वेळी विरोधी भाजपने पाठिंबा दिला होता. या वेळी विधेयक सत्तारूढ भाजपच्या सदस्याचे आहे.

राष्ट्रीय संविधान कार्यप्रणाली आयोगाने आधीच शिफारस केली आहे की, लोकसभा वर्षात कमीत कमी १२० दिवस आणि राज्यसभा १०० दिवस चालावी. संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार सरकारचा असला तरी विशिष्ट संख्येतील सदस्यांना वाटले तर अधिवेशन घेतले जावे. १९५२ ते २००८ दरम्यान लोकसभा अधिवेशन वर्षात १०० पेक्षा जास्त दिवस केवळ २८ वेळा झाले.

१९५२ नंतर कमी होत गेल्या संसदेच्या बैठका
संसदेच्या बैठका १९५२ नंतर सतत कमी होत गेल्याने त्या प्रमाणात कामकाजावरही परिणाम झाला. पीआरएस लेजिस्लेटिव्हनुसार १९५०च्या दशकात संसदेचे कामकाज सरासरी वर्षात १३० दिवस चालायचे. वर्ष २००० मध्ये ही सरासरी घटून ७० दिवसांवर आली. मनमोहन सिंग सरकारच्या वेळी १५ व्या लोकसभेत ३६७ बैठका झाल्या. म्हणजे वर्षभरात सुमारे ७४ दिवस. मग १६ व्या लोकसभेत मोदी सरकारच्या वेळी ३३७ बैठका झाल्या आणि वार्षिक सरासरी ६८ दिवस झाली.

बातम्या आणखी आहेत...